पंतप्रधान कार्यालय
दीपक पुनियाचे कांस्य पदक हुकले असले तरी, त्याने सर्वांची मने जिंकली : पंतप्रधान
Posted On:
05 AUG 2021 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021
दीपक पुनिया ने कांस्य पदकाची लढत थोडक्यात गमावली असली तरीही त्याच्या झुंजार खेळीने त्याने आपल्या सर्वांची मने जिंकली आहेत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. दीपक पुनिया हा खेळासाठीची जिद्द आणि कौशल्याचे ऊर्जाकेंद्र आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले- " दीपक पुनियाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले असले तरीही त्याने आपल्या सर्वांची मने जिंकली आहेत.तो जिद्द आणि क्रीडानैपुण्याचे ऊर्जाकेंद्र आहे. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला माझ्या खूप शुभेच्छा !"
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1742881)
अभ्यागत कक्ष : 342
Read this releasein:
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam