युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

भारताच्या पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेत जिंकले कांस्यपदक


तब्बल 41 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाला आज पदक मिळवण्यात यश

Posted On: 05 AUG 2021 3:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021

ठळक वैशिष्ट्ये:

  • कांस्य पदकासाठी  आज झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात भारताने जर्मनीचा 5-4 असा पराभव केला.
  • राष्ट्रपती रामनाथ कोविन्द आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन.
  • भारताच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन करत, भारताला तुमचा अभिमान असल्याची क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया.

आज एक ऐतिहासिक विजय नोंदवत, टोक्यो ऑलिंपिक 2020 मध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदकासाठीच्या लढतीत, जर्मनीचा 5-4 असा पराभव केला. या विजयासह, भारतीय हॉकी  संघाने, तब्बल 41 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देशाला कांस्य पदक मिळवून दिले. राष्ट्रपती रामनाथ कोविन्द, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या कामगिरीसाठी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग, मुख्य प्रशिक्षक ग्राहम रेड आणि सहायक प्रशिक्षक पीयूष डुबे यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, आणि या सर्वांचे अभिनंदन केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनीही भारतीय संघाचे कौतूक केले. तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या आपल्या पुरुष हॉकी संघाचे हार्दिक अभिनंदन ! आपल्या चमूने या सामन्यात, अद्वितीय कौशल्य, चिकाटी आणि विजयासाठीच्या दृढनिश्चयाचा परिचय दिला. या ऐतिहासिक विजयामुळे, भारतात पुन्हा एकदा हॉकीचे सुवर्णयुग सुरु होईल तसेच या विजय अनेक युवकांना खेळ खेळण्याची, या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. असे राष्ट्रपतींनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, या ऑलिंपिक मध्ये कांस्य पदक मिळवल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. ऐतिहासिक! आजचा हा दिवस आणि हा अविस्मरणीय क्षण प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमचा कोरला गेला आहे. भारताला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या या संपूर्ण चमूचे खूप खूप अभिनंदन. या विजयासह या सर्वांनी भारताची स्वप्ने आणि आकांक्षा- विशेषतः युवांच्या  पूर्ण  केल्या आहेत. भारताला आपल्या हॉकी संघाचा अत्यंत अभिमान आहे. असे त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही या संघाचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी- भारताचा  लक्ष लक्ष वेळा जयजयकार ! बॉईज, तुम्ही करुन दाखवले ! आता आपण शांत राहू शकत नाही! आपल्या पुरुष हॉकी संघाने, ऑलिंपिकच्या इतिहासाच्या पानावर स्वतःचे नशीब स्वतः लिहिले आहे., पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे . आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. अशा शब्दांत आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे .

टॉप्स अर्थात टार्गेट ऑलिम्पिक पोडीएम स्कीम  कडून मिळणारा पाठिंबा :

विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि परदेशात प्रशिक्षण घेण्यास लागणाऱ्या व्हिसासाठी मदत,

फिजिओथेरेपी तज्ञ चमूचा खर्चही टॉप्स कडून केला जातो.

2018 आशियाई स्पर्धांच्या काळात दोन महिन्यांसाठी प्रत्येकी 50,000/ महिना मानधन भत्ता .

मार्च 2021 ते ऑगस्ट  2021 या काळातही खर्चासाठी 50,000/ महिना मानधन 

परदेशात संधी, राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरे, प्रशिक्षक आणि इतर सहाय्यक तसेच हॉकीच्या खेळाची साधने ACTC द्वारे दिली जातात.

निधी  (2016-सध्या )

TOPS संघ : Rs. 16,80,000

TOPS वैयक्तिक : Rs. 3,00,000

ACTC संघ : Rs. 50,00,00,000

एकूण : Rs. 50,19,80,000

 

 

 

 Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1742745) Visitor Counter : 1404