पंतप्रधान कार्यालय
‘विक्रांत’ च्या पहिल्या सागरी चाचणीबद्दल भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2021 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2021
स्वदेशी बनावटीच्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युध्दनौकेच्या पहिल्या सागरी परिक्षणाबद्दल पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे अभिनंदन केले आहे. मेक इन इंडियाचे हे एक अद्भुत उदाहरण असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
''भारतीय नौदलाच्या आरेखन गटाने रचना केलेली आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधणी केलेली स्वदेशी विमानवाहू युध्दनौका 'विक्रांत' ची आज पहिली सागरी चाचणी झाली. हे मेक इन इंडियाचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.हा ऐतिहासिक मैलाचा दगड गाठल्याबद्दल भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे अभिनंदन.''
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1742546)
आगंतुक पटल : 250
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam