पंतप्रधान कार्यालय

बिहारच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या दळणवळणाला दरभंगा विमानतळाने वेग दिल्याबद्दल पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त

प्रविष्टि तिथि: 23 JUL 2021 7:41PM by PIB Mumbai

 

दरभंगा विमानतळाने बिहारमध्ये दळणवळणाला वेग दिल्याबद्दल आणि बिहारच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

एका वापरकर्त्याने  पाठवलेल्या ट्विटर संदेशावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणतात,

"हे ऐकून आनंद वाटतो !

विमानवाहतूक क्षेत्राचा विचार करता, दळणवळणात वाढ करण्यासाठी आणि प्रवासातील आरामदायकता वाढविण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहेत.

दरभंगा विमानतळाबद्दल सांगायचे तर, बिहारच्या प्रगतीत तो महत्त्वाचे योगदान देत आहे."

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1738368) आगंतुक पटल : 243
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam