पंतप्रधान कार्यालय

लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांचे अभिवादन

Posted On: 23 JUL 2021 12:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जुलै 2021

लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशांच्या मालिकेत म्हटले आहे,

महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो . सध्याच्या परिस्थितीत जेव्हा 130 कोटी भारतीयांनी आर्थिक दृष्ट्या संपन्न आणि सामाजिकदृष्ट्या पुरोगामी अशा आत्मनिर्भर भारताची उभारणी सुरू केली आहे , तेव्हा त्यांचे विचार कधी नव्हे एवढे उपयुक्त सिद्ध होत आहेत.

लोकमान्य टिळक हे भारतीय मुल्ये आणि व्यवस्था यावर दृढ विश्वास ठेवणारे होते. शिक्षण तसेच स्त्री सक्षमीकरण या विषयांवरील त्यांचे विचार बहुसंख्य लोकांना प्रोत्साहित करतात.

ते संस्थापक होते. ज्या अनेक उच्च दर्जाच्या संस्था त्यांनी नावारुपाला आणल्या त्या संस्थांनी वर्षांनूवर्षे मार्गदर्शक ठरेल असे काम केले आहे.

 

 G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738057) Visitor Counter : 224