पंतप्रधान कार्यालय
प्रमुख विज्ञान संस्थांशी साधलेल्या संवादाबाबत पंतप्रधानांनी केलेले ट्विटस्
Posted On:
08 JUL 2021 3:46PM by PIB Mumbai
केंद्र पुरस्कृत तंत्रज्ञान संस्थांच्या 100 हून अधिक संचालकांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत सादरीकरण केलेल्या देशातील प्रमुख विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांबरोबर साधलेल्या संवादातील माहिती सामायिक केली. आयआयएससी बंगळुरू , आयआयटी मुंबई, आयआयटी चेन्नई, आयआयटी कानपूर यांच्याबद्दल पंतप्रधानांनी ट्विट केले.
या संदर्भात केलेल्या ट्विटस् शृंखलेत पंतप्रधान म्हणाले
अग्रगण्य आयआयटी आणि @iiscbangalore आयआयएससी बंगळुरूच्या संचालकांबरोबर समृद्ध संवाद पार पडला. भारताला संशोधन आणि विकास , अभिनवता यांचे केंद्र बनवणे आणि तरुणांमध्ये विज्ञान लोकप्रिय करण्यासह विविध विषयांवर यावेळी आम्ही चर्चा केली.
@iiscbangalore आयआयएससी बंगळुरूच्या पथकाने रोबोटिक्स, गणित / विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासारखे शैक्षणिक प्रयत्न, कोविड -19 यासारख्या क्षेत्रात त्यांच्या प्रमुख संशोधन आणि विकास उपक्रमांबाबत एक लक्षवेधी सादरीकरण सामायिक केले. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने आरोग्याला महत्त्व देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
नायट्रोजन जनरेटरला ऑक्सिजन जनरेटरमध्ये रूपांतरित करणे , कर्करोगा वरील उपचारांसाठी सेल थेरपी आणि एलएएसई प्रोग्राम सुरू करणे, मास्टर्स इन डिजिटल हेल्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स यासारख्या शैक्षणिक नवकल्पनांबद्दल @iitbombay आयआयटी मुंबईच्या विस्तृत कार्याबद्दल माहिती जाणून घेताना मला आनंद झाला.
v
@iitmadras आयआयटी मद्रासच्या चमूने कोविड संसर्ग कमी करण्याच्या प्रयत्नांविषयी सांगितले. उदा. मॉड्यूलर हॉस्पिटल सुरू करणे, हॉटस्पॉटचा अंदाज वर्तवणे, त्यांचे बहु-शाखीय संशोधन आणि त्यांचे ऑनलाइन बीएससी. इन प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्स. संपूर्ण भारतात डिजिटल व्याप्ती वाढवण्यावर ते काम करत आहेत.
@IITKanpur आयआयटी कानपूर हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भविष्यकालीन संशोधन आणि अभिनव कल्पना , हवेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणे, इलेक्ट्रॉनिक इंधन इंजेक्शन इत्यादींचे केंद्र बनल्याचे पाहून अभिमान वाटतो. स्टार्ट-अप्स, व्यावसायिकांना कौशल्य वाढवण्यासाठी दिले जात असलेल्या सहकार्यामुळे भारताच्या युवा शक्तीला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
बैठकीचा तपशील येथे पाहता येईल - https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1733638
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733781)
Visitor Counter : 263
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam