पंतप्रधान कार्यालय

ऑलिम्पिक दिनानिमित्त भारतीय ऑलिम्पिकपटूंची पंतप्रधानांकडून प्रशंसा


टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

MyGov ऑलिम्पिक प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे युवावर्गाला केले आवाहन

प्रविष्टि तिथि: 23 JUN 2021 8:45AM by PIB Mumbai

 

गेली अनेक वर्षे ऑलिम्पिक स्पर्धांमधून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रीडापटूंविषयी देशाला अभिमान असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ऑलिम्पिक दिनानिमित्त व्यक्त केली आहे. टोकियो ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय चमूला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

आजच्या ऑलिम्पिक दिनानिमित्त, गेली अनेक वर्षे ऑलिम्पिक स्पर्धांमधून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रीडापटूची प्रशंसा करत क्रीडा क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाचा आणि इतर खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचा देशाला अभिमान असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

काही आठवड्यातच टोकियो ऑलिम्पिक 2020 सुरु होणार आहे. आपल्या सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असलेल्या आपल्या पथकाला शुभेच्छा. या ऑलिम्पिक स्पर्धेआधी MyGov ही प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांनी विशेषकरून युवा मित्रांनी सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

https://quiz.mygov.in/quiz/road-to-tokyo-2020/
 

****

STupe/NChitale/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1729625) आगंतुक पटल : 294
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam