मंत्रिमंडळ
डीपीआयआयटी सचिव डॉ. गुरुप्रसाद मोहपात्रा यांच्या निधनाबद्दल कॅबिनेट सचिवांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2021 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2021
कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी डीपीआयआयटीचे सचिव डॉ. गुरुप्रसाद मो हपात्रा यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोकसंदेशात गौबा म्हणाले, “डॉ. मोहपात्रा एक निकटचे सहकारी आणि धोरणात्मक विचार आणि नेतृत्व असणारे असामान्य अधिकारी होते.
अधिकारप्राप्त गटांपैकी एकाचे प्रमुख म्हणून त्यांनी कोविड -19 महामारी विरुद्ध चालू असलेल्या लढ्यात अत्यंत समर्पित वृत्तीने काम केले.
कोविड चाचणीत संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर आणि तब्येत ठीक नसतानाही अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी देशभर ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर देखरेख ठेवून कित्येक तास काम केले.
सक्रिय दृष्टिकोन आणि सार्वजनिक सेवेप्रति वचनबद्धतेबद्दल ते कायम स्मरणात राहतील. त्याचा अकाली मृत्यू ही आपल्या सर्वांसाठी कधीही भरून न येणारी हानी आहे. मी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो, असे गौबा यांनी म्हटले आहे.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1728596)
आगंतुक पटल : 205
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam