पंतप्रधान कार्यालय
महान धावपटू मिल्खा सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2021 8:16AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान धावपटू मिल्खा सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मोदी यांनी त्यांचे वर्णन एक महान क्रीडापटू म्हणून केले, ज्यांनी देशाला भारावून टाकले आणि असंख्य भारतीयांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले.
"मिल्खासिंग यांच्या निधनामुळे आपण एक महान खेळाडू गमावला आहे ज्याने देशाला भारावून टाकले आणि असंख्य भारतीयांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या प्रेरणादायक व्यक्तिमत्वाने त्यांना लाखो लोकांमध्ये लोकप्रिय बनवले. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे.
मी काही दिवसांपूर्वी मिल्खासिंग यांच्याशी बोललो होतो. हे आमचे शेवटचे संभाषण असेल असे मला वाटले नव्हते. अनेक नवोदित खेळाडूंना त्यांच्या जीवन प्रवासातून सामर्थ्य मिळेल. त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि जगभरातील अनेक प्रशंसकांप्रति मी संवेदना व्यक्त करतो.", असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.
***
STupe/SKane/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1728456)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam