आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
70 दिवसांनंतर भारतातील सक्रीय रुग्णसंख्या 9 लाखांच्या खाली आली
गेल्या 24 तासात 62,224 नवीन रुग्णांची नोंद
एक महिन्यापेक्षा अधिक काळ दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक
रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 95.80 %
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.22 %, सलग 9 व्या दिवशी 5% ने कमी
Posted On:
16 JUN 2021 10:52AM by PIB Mumbai
देशात कोविडचे दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. गेल्या २४ तासात देशात 62,224 इतकी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 9 दिवसांपासून 1 लाखांपेक्षा कमी दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद आहे. हे केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सततच्या आणि सहयोगी प्रयत्नांचे परिणाम आहेत.
देशात उपचार घेत असलेल्या रुग्ण संख्येतही सातत्याने घट होत आहे. देशातील सक्रीय रुग्णसंख्या आज 8,65,432 इतकी आहे. ७० दिवसानंतर रुग्णसंख्या 9 लाखांपेक्षा कमी आली आहे.
गेल्या 24 तासात उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत 47,946 ने घट झाली असून उपचाराधीन रुग्ण, देशाच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 2.92 टक्के आहेत.
कोविड – १९ च्या संसर्गातून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्यामुळे दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सलग 34 व्या दिवशीही जास्त आहे. गेल्या 24 तासात1,07,628 रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे.
दैनंदिन नवीन रुग्ण संख्येच्या तुलनेत 45 हजारांहून अधिक (45,404) रुग्ण गेल्या २४ तासात बरे झाले आहेत.
आतापर्यंत देशातील 2,83,88,100 व्यक्ती कोरोनामधून बर्या झाल्या असून गेल्या 24 तासात 1,07,628 रुग्ण बरे झाले आहेत.
देशभरीत चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासात 19,30,987 चाचण्या करण्यात आल्या असून देशात आतापर्यंत सुमारे 38.88 कोटी (38,33,06,971) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्या वाढवत असतानाच साप्ताहित पॉझिटिव्हिटी दरामध्ये सातत्याने घट होत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 4,17 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 3.22 % इतका आहे. सलग 9 व्या दिवशी हा 5% पेक्षा कमी आहे.
आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार, भारताने 26 कोटी मात्राचा लसीकरण करण्याचा टप्पा काल गाठला आहे. एकूण 36,17,009 सत्रांमधून 26,19,71,014 लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. मागील 24 तासांमध्ये 28,00,458 इतक्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
***
Jaidevi PS/Seema S/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727473)
Visitor Counter : 188
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada