आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात गेल्या 24 तासात 80,834 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 71 दिवसानंतर सर्वात कमी रुग्ण आढळले
भारतात सक्रिय रुग्णसंख्येत 10,26,159 पर्यंत घसरण
Posted On:
13 JUN 2021 11:28AM by PIB Mumbai
भारतात गेल्या 24 तासात 80,834 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. देशात गेले 6 दिवस सलग 1 लाखांपेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतात सक्रिय रुग्णसंख्येतही सतत घट दिसून येत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आज 10,26,159 आहे.सलग तेरा दिवसांपासून सक्रिय रुग्णसंख्या 20 लाखांच्या खाली आहे.
गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्या 54,531 रुग्णांची घट दिसून आली आणि देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत आता सक्रिय रुग्णांचे प्रमाण 3.49% आहे.
कोविड-19 संसर्गातून बरेच लोक बरे होत आहेत, सलग 31 दिवस भारतात दैनंदिन नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 1,32,062 रुग्ण कोरोनातून बरे झाले. गेल्या 24 तासात दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत अधिक 51,228 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
महामारीच्या सुरूवातीपासूनच संक्रमित लोकांपैकी, 2,80,43,446 जण यापूर्वीच कोविड-19 मधून बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासात 1,32,062 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण 95.26% असून हे प्रमाण सतत वाढीचा कल दर्शवत आहेत
संपूर्ण देशभरात चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत देशात एकूण 19,00,312 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकूण 37.81 कोटी (37,81,32,474) चाचण्या झाल्या आहेत.
देशभरात एकीकडे चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत , तर दुसरीकडे साप्ताहिक रुग्णसंख्येत सतत घट दिसून येत आहे.साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.74% आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 4.25% आहे. गेले सलग 20 दिवस हा दर 10% पेक्षा कमी राहिला आहे.
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशात देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रांचा 25 कोटींचा टप्पा काल पार झाला. गेल्या 24 तासात लसीच्या 34,84,239 मात्रा देण्यात आल्या.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या माहितीनुसार, आतापर्यंत 35,05,535 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून लसीच्या एकूण 25,31,95,048 मात्रा देण्यात आल्या.
***
MC/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726752)
Visitor Counter : 246
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam