पंतप्रधान कार्यालय

क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी-2022 मध्ये पहिल्या दोनशेमध्ये झळकल्याबद्दल आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयआयएससी बेंगळुरूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


संशोधनाच्या बाबतीत आयएससी बेंगळुरू जगात सर्वोत्कृष्ट

Posted On: 09 JUN 2021 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जून 2021

क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी-2022 मध्ये पहिल्या दोनशेमध्ये झळकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था)-मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बेंगळुरूचे अभिनंदन केले आहे.

अभिनंदनपर ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात,

आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था)-मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बेंगळुरूचे  हार्दिक अभिनंदन !

भारतातील अधिकाधिक विद्यापीठे व शिक्षणसंस्थांनी जागतिक गुणवत्तेच्या मापदंडांवर उत्कृष्ट ठरावे आणि तरुणाईतील बौद्धिक श्रीमंतीला पाठबळ द्यावे, या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

 

M.Chopade/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1725778) Visitor Counter : 191