PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 09 JUN 2021 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 9 जून 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

गेल्या 24  तासांत, भारतात 92,596 इतक्या  दैनंदिन नव्या रुग्णांची  नोंद झाली  आहे. गेल्या सलग  दोन दिवसात देशभरात एक लाखांहून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे.

भारतात सक्रिय रुग्णसंख्येमध्ये सतत घट होत आहे. देशातील सक्रीय रुग्णसंख्या आज 12,31,415 इतकी नोंदवली गेली. सलग नऊ दिवसांपासून रुग्णसंख्या 20 लाखांपेक्षा कमी आहे.

गेल्या 24  तासांत रुग्णसंख्येत 72,287 ची घट नोंदवली गेली आहे आणि सध्या देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी केवळ 4.23% रुग्ण उपचाराधीन आहेत.

भारतात  दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या, दैनंदिन  नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा सलग 27 व्या दिवशी अधिक आहे. गेल्या 24 तासात 1,62,664 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली.

दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत, गेल्या 24 तासांत 70,068 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

या महामारीचा संसर्ग सुरू झाल्यापासून आजपर्यंत 2,75,04,126 नागरीक कोविड -19 या आजारातून  बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासांत 1,62,664 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर सतत वाढता कल दर्शवत असून तो 94.55% इतका आहे. 

गेल्या 24  तासात देशभरात  एकूण 19,85,967 चाचण्या करण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण 37 कोटी (37,01, 93,563) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

देशभरात एकीकडे चाचण्या करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे, परंतु साप्ताहिक पाँझिटिव्हिटी दरात सतत घट दिसून येत आहे. सध्या साप्ताहिक पाँझिटिव्हिटी दर 5.66% वर आहे तर दैनंदिन पाँझिटिव्हिटी दर आज 4.66% आहे. आता सलग 16 दिवस हा दर 10% पेक्षा कमी राहिलेला  आहे.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात राबविल्या जाणाऱ्या कोविड -19 लसींच्या मात्रांच्या एकूण संख्येने  आज 23.90 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत 27,76,096 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 23,90 58,360 लसींच्या  मात्रा 33,44,533 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत.

इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्‌स:

मंगळवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 10,891 नवे रुग्ण आढळले असून त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 58,52,891 पर्यंत पोहोचली आहे. कोरोनातून बरे झालेले 16,577 रुग्ण मंगळवारी विविध रुग्णालयांमधून घरी परतले. परिणामी राज्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची एकूण संख्या 55,80,925 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 295 ने वाढून 1,01,172 पर्यंत पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,67,927 इतकी आहे. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.35 टक्के इतका असून, मृत्यूचे प्रमाण 1.73 टक्के इतके आहे. मंगळवारी मुंबईत कोविड-19 मुळे सात रुग्णांचा मृत्यू झाला. या महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रारंभ होत असताना मुंबईत 20 मार्च रोजी सात व्यक्तींचा मृत्यू ओढवला होता, तेव्हापासूनच्या अडीच महिन्यांतील ही सर्वात कमी मृत्युसंख्या आहे. मंगळवारी मुंबईत 682 नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर 3 टक्क्यांच्या खाली कायम आहे. चालू-फिरू न शकणाऱ्या व रुग्णशय्येवर झोपून असणाऱ्या वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने बेलापूरमध्ये नर्मदा निकेतन, विश्रामधाम आणि पारिजात आश्रम येथे विशेष लसीकरण सत्रे घेतली. सदर लाभार्थ्यांची सरकारी कोविन पोर्टलवर पुनर्नोंदणी करण्यात आली.

गोवा अपडेट्‌स :

मंगळवारी गोव्यामध्ये 473 नवीन रुग्णांची नोंद झाली व 14रुग्णांचा मृत्यू ओढवला. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1,60,284 वर व मृत्युसंख्या 2,859 वर पोहोचली. दिवसभरात 957 व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडल्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 1,51,526 पर्यंत पोहोचली. आता गोव्यात 5,899 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

M.Chopade/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1725771) Visitor Counter : 294