रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्सप्रेसकडून  देशात सुमारे  27600 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू वितरित


देशभरात 392 ऑक्सिजन एक्सप्रेसनी पूर्ण केले प्राणवायूचे वितरण

Posted On: 08 JUN 2021 6:47PM by PIB Mumbai

 

सर्व अडथळ्यांवर मात करत  नवीन उपाय शोधत  भारतीय रेल्वे  देशभरातील विविध राज्यांमध्ये  द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचे वितरण करत दिलासा देण्याचा  प्रयत्न करत आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेसने देशसेवेत  27000 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू वितरणाचा टप्पा पार केला आहे.

आतापर्यंत, भारतीय रेल्वेने सुमारे 27600 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू  देशभरातील विविध राज्यात 1603 हून अधिक टँकरद्वारे वितरित केला आहे.

दखल घेण्यासारखी बाब म्हणजे  392 ऑक्सिजन एक्सप्रेसने आतापर्यंतचा प्रवास पूर्ण करत विविध राज्यांना दिलासा दिला आहे.

हे पत्रक जारी होईपर्यंत 21 टँकरमध्ये  381 मेट्रिक टनहून अधिक द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू भरलेल्या 4  ऑक्सिजन एक्स्प्रेस प्रवासात होत्या.

उल्लेखनीय बाब म्हणजे  ऑक्सिजन एक्स्प्रेसने 45 दिवसांपूर्वी 24 एप्रिलला  महाराष्ट्रात 126 मेट्रिक टन प्राणवायू आणण्यापासून वितरणाला सुरुवात  केली.

प्राणवायूची  मागणी करणाऱ्या राज्यांना शक्यतो अत्यंत कमी वेळात जास्तीत जास्त प्रमाणात द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू  पुरवण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.

उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम या 15 राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्प्रेसने प्राणवायूची मदत पोहोचवली आहे.

आतापर्यंत देशभरातील 15 राज्यांमधील सुमारे 39 शहरे/नगरांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू  उतरवण्यात आला आहे.

देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जसे की पश्चिमेला  हापा, वडोदरा , मुंद्रा आणि  पूर्वेला  राउरकेला, दुर्गापुर, टाटानगर, अंगुल यासारख्या ठिकाणांहून प्राणवायू घेऊन  जटिल परिचालन मार्ग नियोजनातून तो राज्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. 

प्राणवायूची मदत शक्य तितक्या वेगाने पोहोचावी यासाठी ऑक्सीजन एक्सप्रेस मालगाड्यांच्या  माध्यमातून रेल्वे नवे मापदंड आणि आदर्श रचत आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेस पुढे जात राहावी यासाठी रेल्वेमार्ग खुले ठेवले जातात आणि उच्च दक्षता ठेवली जाते.

***

M.Chopade/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1725390) Visitor Counter : 231