पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी देशातील युवकांना त्यांच्या लेखन कौशल्याचा वापर करून भारताच्या बौद्धिक संपदेत योगदान देण्याचे केले आवाहन

Posted On: 08 JUN 2021 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जून 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना भविष्यात नेतृत्व पदाची जबाबदारी सांभाळण्याच्या दृष्टीने युवा विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणण्यासाठी सुरु केलेल्या  YUVA: Prime Minister’s Scheme For Mentoring Young Authors या राष्ट्रीय योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ट्वीटद्वारे दिलेल्या संदेशात पंतप्रधान मोदी म्हणतात,

युवकांना त्यांचे लेखनकौशल्य वापरण्यासाठी आणि भारताच्या बौद्धिक संपदेत योगदान देण्यासाठी ही अत्यंत आकर्षक संधी आहे. या योजनेची अधिक माहिती https://innovateindia.mygov.in/yuva/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये युवावर्गाच्या बुद्धीला अधिक सक्षम करण्यावर आणि भविष्यात नेतृत्व पदाची जबाबदारी सांभाळण्याच्या दृष्टीने युवा विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणण्यासाठी उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.

हे ध्येय साध्य करण्यासाठी तसेच भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वी वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेली YUVA: Prime Minister’s Scheme For Mentoring Young Authors ही नवी राष्ट्रीय योजना दीर्घकाळ या उद्याच्या नेत्यांसाठी आवश्यक असलेला भक्कम पाया निर्माण करेल.

तत्वत: देश स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 व्या वर्षपूर्तीकडे जात असताना देशातील युवकांची भारतीय साहित्याचे आधुनिक दूत म्हणून जोपासना करण्याच्या दृष्टीने ही योजना सुरु करण्यात आली आहे. पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात भारताचा तिसरा क्रमांक लागतो आणि स्वदेशी साहित्य निर्मितीच्या या खजिन्यात आणखी भर टाकण्यासाठी या नव्या योजनेला जागतिक मंचावर प्रसिद्धी देणे अत्यावश्यक आहे.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1725594) Visitor Counter : 180