रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना (BOV) नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे किंवा नुतनीकरणासाठी शुल्कात सवलत देणाऱ्या प्रस्तावाची प्रारुप अधिसुचना रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने केली जारी
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2021 10:45AM by PIB Mumbai
रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने 27 मे, 2021 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधे आणखी एक सुधारणा केली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे किंवा त्यांच्या नुतनीकरण आणि नव्या नोंदणीचे चिन्ह प्राप्त करण्यासाठीच्या शुल्कामध्ये सूट देण्याचा प्रस्ताव आहे.
ई-मोबीलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही अधिसूचना जारी केली आहे. सर्वसामान्य जनता आणि संबंधित घटकांकडून याबाबत मते मागवली आहेत. अधिसूचनेचा मसुदा जारी झाल्यानंतर सूचना/ मते तीस दिवसांच्या आत पाठवायची आहेत.
***
Jaidevi PS/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1723367)
आगंतुक पटल : 236