आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ती 22,28,724, गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 1,14,428 ने घट
1.73 लाख नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद, गेल्या 45 दिवसातली सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या
गेल्या दोन दिवसात दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 2 लाखापेक्षा कमी
सलग 16 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक
बरे होण्याचा दर वाढून 90.80% वर पोहोचला
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 8.36%, सलग पाचव्या दिवशी तो 10% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ.; आतापर्यंत एकूण 34.1 कोटी चाचण्या
Posted On:
29 MAY 2021 10:20AM by PIB Mumbai
भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ती आज 22,28,724 पर्यंत कमी झाली आहे. 10 मे 2021 रोजी सक्रिय रुग्णांची सर्वोच्च संख्या गाठल्यापासून सक्रिय रुग्णसंख्या कमी होऊ लागली.
गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत एकूण 1,14,428 रुग्णांची घट झाली असून देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत सक्रिय संख्या आता केवळ 8.04% आहे
दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत सतत घट होत असून आतापर्यंत सलग तेराव्या दिवशी देशात दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 3 लाखांपेक्षा कमी राहिली आहे. गेल्या दोन दिवसात दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी नोंदली गेली.
गेल्या 24 तासात 1,73,790 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली.
भारतात बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांच्या तुलनेत सतत वाढत असून सलग 16 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक राहिली. गेल्या 24 तासात 2,84,601 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासात 1,10,811 रुग्ण बरे झाले.
महामारी सुरु झाल्यापासून कोविड-19 ने बाधित झालेल्यांपैकी आजपर्यंत 2,51,78,011 लोक बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासात 2,84,601 रुग्ण कोरोनातून बरे झाले. बरे होण्याचा एकूण दर 90.80% वर पोहचला आहे.
गेल्या 24 तासात देशात एकूण 20,80,048 चाचण्या करण्यात आल्या असून भारतात आतापर्यंत एकूण 34.11 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात एकीकडे चाचण्या वाढवल्या आहेत तर दुसरीकडे साप्ताहिक रुग्ण पॉसिटिव्हीटी दरात सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 9.84% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दरात घट होऊन तो आज 8.36% झाला आहे. हा दर आता सलग पाचव्या दिवशी 10% पेक्षा कमी राहिला आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड -19 प्रतिबंधक लसींच्या 20.89 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीच्या 20 कोटी मात्रा देऊन लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा गाठणारा भारत अमेरिकेनंतर दुसरा देश आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या अहवालानुसार, 29,72,971 सत्रांच्या माध्यमातून लसीच्या एकूण 20,89,02,445 मात्रा देण्यात आल्या आहेत
यात समावेश आहे:
***
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722624)
Visitor Counter : 212
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam