आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

21.23 लाख चाचण्या पूर्ण करत गेल्या 24 तासांत भारताने आतापर्यंत सर्वाधिक कोविड चाचण्या करण्याचा नवा विक्रम नोंदविला

36 दिवसांनंतर सर्वात कमी म्हणजे 2.4 लाख दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद झाली

Posted On: 23 MAY 2021 11:25AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांत 21.23 लाखांहून अधिक चाचण्या पूर्ण करत, भारताने पुन्हा एकदा ,एकाच दिवसात सर्वाधिक चाचण्यांचा करण्याचा नवीन विक्रम नोंदविला आहे. 20 लाखांहून अधिक चाचण्या करण्याचा हा सलग पाचवा दिवस आहे. 2020 च्या जानेवारीपासून भारताने दररोज चाचण्या करण्याच्या आपल्या क्षमतेत सुमारे 25 लाख पर्यंत उल्लेखनीय वाढ केली आहे.

मागील 24 तासांत देशात एकूण 21,23,782 चाचण्या घेण्यात आल्या.

आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे, सलग सातव्या दिवशी भारतातील दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत 3 लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

 

गेल्या 24 तासांत 2,40,842 दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद झाली. ही 17 एप्रिल 2021 नंतरची ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे, ज्यावेळी दैनंदिन नवीन रुग्णसंख्या 2.34 लाख इतकी होती.

भारतात सलग नवव्या दिवशी, दैनंदिन कोविडमुक्त होण्याऱ्या रुग्णांची संख्या ,दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांपेक्षा ,वाढत आहे. गेल्या 24 तासांत 3,55,102 रूग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद झाली.

भारतात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आज 2,34,25,467 वर पोहोचली आहे.रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 88.30% पर्यंत पोहोचला आहे.

दुसरीकडे, भारतातील एकूण सक्रिय रूग्णसंख्या आज 28,05,399 वर पोचली आहे.

गेल्या 24 तासांत 1,18,001 ची घट नोंदवली गेली. आता देशातील एकूण रूग्णांपैकी 10.57% रूग्ण सक्रीय आहेत.

भारताच्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 66.88% रूग्ण 7 राज्यांत आहेत.

राष्ट्रीय मृत्यु दर सध्या 1.13% इतका आहे.

गेल्या 24 तासांत 3,741 मृत्यूंची नोंद झाली.

त्यापैकी 73.88% मृत्यू दहा राज्यांत झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक (682) मृत्यू झाले त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 451 मृत्यूंची नोंद झाली.

देशभरात लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत लसींच्या एकूण मात्रांनी 19.50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

***

MC/SP/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1721034) Visitor Counter : 124