आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत नव्याने सुरू झालेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांद्वारे राज्यांना प्रगत कोविड सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत


कोविड संकटात तृतीयक स्तरावरील आरोग्य सेवेतील क्षेत्रीय असंतुलनासंदर्भात लक्ष केंद्रित करण्यात आले


म्यूकरमायकोसिसवरील उपचारांसाठी सज्ज

Posted On: 19 MAY 2021 9:28AM by PIB Mumbai

पंतप्रधान स्वास्थ्यसुरक्षा योजना (पीएमएसएसवाय) ही केंद्रीय क्षेत्रीय योजना ऑगस्ट 2003 मध्ये देशातील तृतीयक दर्जाच्या रुग्णालयातील व्यवस्था सुधारण्यासाठी जाहीर करण्यात आली होती.

दुर्लक्षित मागास भागातील राज्यांमधून दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळावे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना पूर्णत्वाला नेण्यासाठी या योजनेला नवीन प्रेरणा मिळाली आणि पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत अनेक नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन केल्या जात आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत 22 नवीन एम्सच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली असून त्यापैकी सहा एम्स, भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पाटणा, रायपूर आणि ऋषिकेश येथे आधीच कार्यरत झाल्या आहेत. आणखी सात एम्समध्ये बाह्य रूग्ण विभाग(OPD) सुविधा आणि एमबीबीएस अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू झाले आहेत, तर आणखी पाच संस्थांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाचे  वर्ग सुरू झाले आहेत.

या प्रादेशिक एम्स, पीएमएसएसवाय अंतर्गत स्थापन झाल्या असून किंवा स्थापन होत असून, गेल्या वर्षीच्या, या महामारीच्या सुरुवातीपासूनच कोविडच्या व्यवस्थापनात या संस्थांनी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे त्यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेचे आव्हान स्विकारताना आपल्या खाटांची उपलब्धता वाढवून कौतुकास्पद कार्य केले आहे.

एप्रिल 2021 च्या दुसर्‍या आठवड्यापासून या संस्थांमधून 1300  हून अधिक ऑक्सिजन बेड आणि सुमारे 530 आयसीयू बेड उपलब्ध केले आहेत आणि लोकांसाठी ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची सध्याची उपलब्धता अनुक्रमे 1900 आणि 900 इतकी  आहे.

नवीन एम्समध्ये उपलब्ध कोविड बेडची सध्याची उपलब्धता खालीलप्रमाणे आहेः


कोविड रुग्णांच्या सोयीसाठी या नवीन एम्सच्या क्षमतांचे सबलीकरण करण्यासाठी भारत सरकारकडून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन केंद्रे, ऑक्सिजन सिलेंडर्स, एन-95 मास्क, पीपीई किट आणि फॅव्हीपीरावीर, रेमडेसव्हिर आणि टोसिलिजुमॅब यासारख्या अत्यावश्यक औषधांचा समावेश करत तसेच इतर उपकरणांचा पुरवठा करून बळकटी दिली जात आहे.

तृतीयक श्रेणीची ही सेवा केंद्रे नवीन असल्याने, या नवीन प्रादेशिक एम्स मधून इतर गंभीर नॉन-कोविड आरोग्य सेवा देखील कोविड रूग्णांपर्यंत पोचविल्या जात आहेत.

एम्स रायपूरमध्ये या केंद्राने मार्च 2021 पासून 17 मे 2021 पर्यंत एकूण 9664 कोविड रूग्णांवर उपचार केले.



देशात सध्या वेगवेगळ्या राज्यांमधून म्यूकरमायकोसिस रूग्णांची नोंद होत आहे. ही स्थिती सामान्यत: कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या आणि मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये दिसून येते. तथापि, या रोगासाठीही रायपूर, जोधपूर, पटना, ऋषिकेश, भुवनेश्वर आणि भोपाळ येथील एम्सकडून आणि काही पूर्णत: कार्यरत न झालेल्या एम्समधून प्रभावी आणि उच्च प्रतीचे उपचार दिले जात आहेत.

 

****


ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719865) Visitor Counter : 232