PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
17 MAY 2021 9:00PM by PIB Mumbai

- Daily new COVID cases less than 3L after 26 days
- More than 20 crore vaccine doses provided to States/UTs Free of Cost by Govt. of India, so far
- Bleeding and clotting events following COVID vaccination miniscule in India
- Inspite of upcoming cyclone, Railways run 2 Oxygen Expresses early morning today from Gujarat to deliver 150 MT of Oxygen to the Nation
- Raksha Mantri Shri Rajnath Singh unveils first batch of anti-COVID drug developed by DRDO and hands over to Health Minister Dr Harsh Vardhan
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona


नवी दिल्ली/मुंबई, 17 मे 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
कोरोनासंदर्भातल्या एका दिलासादायी घडामोडीत, 26 दिवसानंतर दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखापेक्षा कमी नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासात 2,81,386 नव्या रुग्णांची नोंद झाली.
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दरात घटता कल असून खाली दर्शवल्याप्रमाणे हा दर आज 18.17% आहे. गेल्या 24 तासात 15,73,515 चाचण्या तर आतापर्यंत 31,64,23,658 चाचण्या करण्यात आल्या.
पॉझीटीव्हिटी दर जास्त असणाऱ्या जिल्ह्यांची राज्य निहाय संख्या खाली दर्शवण्यात आली असून कर्नाटकमध्ये सर्वात जास्त म्हणजे 27 जिल्ह्यांमध्ये हा दर 20 टक्क्याहून अधिक आहे. मध्य प्रदेशात 38 जिल्ह्यांमध्ये हा दर 10 टक्क्याहून अधिक आहे.
भारतात कोरोना मुक्त झालेल्यांची एकूण संख्या आज 2,11,74,076 झाली आहे. आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 84.81% इतका आहे. गेल्या 24 तासात 3,78,741 रुग्ण बरे झाले. बरे झालेल्यांची संख्या ही कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येपेक्षा जास्त असण्याची गेल्या सात दिवसातली ही सहावी तर सलग चौथी वेळ आहे. नुकत्याच बरे झालेल्यांपैकी 71.35% हे दहा राज्यातले आहेत.
भारताच्या एकूण उपचाराधीन रुग्ण संख्येत आज 35,16,997 पर्यंत घट झाली. गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्ण संख्येत 1,01,461 ने घट झाली आहे. उपचाराधीन रुग्ण संख्येपैकी 75.04% इतकी संख्या दहा राज्यातली आहे.
कोविड -19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रा आज 18.30 कोटीच्या जवळ पोहोचल्या आहेत. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 26,68,895 सत्रांद्वारे 18,29,26,460 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 96,45,695 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 66,43,661 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,44,44,096 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 81,96,053 फ्रंट लाईन कर्मचारी (दुसरी मात्रा ), 18-45 वयोगटामधले 52,64,073 लाभार्थी ( पहिली मात्रा ) 45 ते 60 वयोगटातले 5,72,78,554 ( पहिली मात्रा ), आणि 91,07,311 लाभार्थी (दुसरी मात्रा ) 60 वर्षावरील 5,45,15,352 लाभार्थी ( पहिली मात्रा ), 1,78,01,891 (दुसरी मात्रा ) यांचा समावेश आहे. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.73% मात्रा या दहा राज्यात देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 18-44 वर्षे वयोगटाच्या 4,35,138 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे आणि लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्यामध्ये 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 52,64,073 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 7 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
लसीकरण अभियानाच्या 121 व्या दिवशी (16 मे 2021) ला 6,91,211 मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 6,068 सत्रात 6,14,286 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 76,925 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
नव्या रुग्णांपैकी 75.95% रुग्ण, दहा राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 34,389 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर तामिळनाडूमध्ये 33,181 नव्या रुग्णांची नोंद झाली.
राष्ट्रीय मृत्यू दर सध्या 1.10% आहे. गेल्या 24 तासात 4,106 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी 75.38% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 974 जणांचा मृत्यू झाला, कर्नाटक मध्ये 403 जणांचा मृत्यू झाला.
परदेशातून आलेल्या मदतीचे वेगाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरण सुरु आहे. आतापर्यंत 11,058 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, 13,496 ऑक्सिजन सिलेंडर,19 ऑक्सिजन निर्मिती सयंत्रे, 7,365 व्हेंटीलेटर/ बाय पॅप, 5.3 लाख रेमडेसिवीर वायलचे रस्ते आणि हवाई मार्गे वितरण करण्यात आले आहे.
इतर अपडेट्स :
महाराष्ट्र अपडेट:
महाराष्ट्रात, रविवारी कोविड-19 मुळे झालेल्या 974 मृत्यूंची नोंद झाली असून मृत्युसंख्या 81,486 वर पोहोचली आहे. तर 34,389 नव्या रुग्णांची नोंद झाली ही संख्या सलग तिसऱ्या दिवशी 40,000 च्या खाली राहिली.सध्या राज्यात 4,68,109 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबई शहरात 1,535 नव्या कोरोनाबाधितांची आणि 60 मृत्यूंची नोंद झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी, राज्यातील विविध भागातील 17,000 हून अधिक डॉक्टरांना संबोधित केले. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त, राज्य कोविड-19 कृती दलाच्या सदस्यांनीही या ऑनलाईन परिषदेत सहभागी झालेले फॅमिली डॉक्टर आणि वैद्यकीय चिकित्सकांना मार्गदर्शन केले.
गोवा अपडेट:
गोव्यामध्ये रविवारी एकूण 3,793 कोविड-19 रुग्ण कोरोनामुक्त झाले.तर 1,314 नवे कोरोनाबाधित आढळले तर 43 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. गोव्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,35,856 वर पोहोचली आहे तर मृत्युसंख्या 2,099 आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढून 1,05,505 झाली आहे, राज्यात सध्या 28,252 सक्रिय रुग्ण आहेत.
IMPORTANT TWEETS
* * *
M.Chopade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1719488)
Visitor Counter : 136