रेल्वे मंत्रालय

आगामी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरही देशामध्ये 150 मेट्रिक टन ऑक्सिजनचे वितरण करण्यासाठी रेल्वेने आज पहाटे 2 ऑक्सिजन एक्सप्रेस सोसाट्याच्या वाऱ्याचा सामना करत गुजरातवरून केल्या रवाना


ऑक्सिजन एक्सप्रेसने 10000 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचे वितरण करून महत्वाचा टप्पा ओलांडला

Posted On: 17 MAY 2021 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 मे 2021

 

सर्व अडथळ्यांवर मात करीत आणि नवे उपाय शोधत द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचे वितरण देशभरातील विविध राज्यांना करून दिलासा देत भारतीय रेल्वेने आपला प्रवास सुरूच ठेवला आहे.

आगामी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, देशामध्ये 150 मेट्रीक टन ऑक्सिजनचे वितरण करण्यासाठी रेल्वेने आज पहाटे 2 ऑक्सिजन एक्स्प्रेस, सोसाट्याच्या वाऱ्याचा सामना करत गुजरातवरून रवाना केल्या.

दिल्ली क्षेत्रात ऑक्सिजनचे वितरण करण्यासाठी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस,  2 रोरो ट्रक आणि 45 मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन घेऊन वडोदऱ्याहून पहाटे 4 वाजता रवाना झाली.

बोकारोहुन पंजाबला जाणारी पहिली ऑक्सिजन एक्सप्रेसही 41.07 मेट्रीक टन ऑक्सिजनच्या दोन टँकर्ससह आज संध्याकाळी 7 पर्यंत फिल्लौरला पोहचणार आहे.

हे नमूद करावे लागेल की, 23 दिवसांपूर्वी 24 एप्रिल 2021 रोजी ऑक्सिजन एक्प्रेसने महाराष्ट्रात 126 मेट्रीक टन ऑक्सिजनचे वितरण करून हा प्रवास सुरु केला होता.

23 दिवसांच्या कालावधीत 13 राज्यांमध्ये 10300 मेट्रिक टनपेक्षा अधिक वैद्यकीय ऑक्सिजन वितरीत करण्यासाठी रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या कार्यान्वयनात वाढ केली आहे.

देशभरात आपले कार्यान्वयन सुरू ठेवत भारतीय रेल्वे पश्चिमेकडील हापा आणि  मुंद्रा तसेच पूर्वेकडील रौरकेला, दुर्गापूर, टाटानगर, अंगुल यांसारख्या ठिकाणांहून ऑक्सिजन वाहून नेत उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, हरयाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये त्याचे वितरण करीत आहे.

शक्य तितक्या लवकर ऑक्सिजनची मदत पोहोचविणे सुनिश्चित करण्यासाठी, ऑक्सिजनची वाहतूक करण्याच्या दृष्टीने, ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्या चालविण्यासाठी रेल्वे अभूतपूर्व उंची गाठत आहे.

ऑक्सिजन एक्स्प्रेसचे सुलभ मार्गक्रमण सुनिश्चित करण्यासाठी, रेल्वेमार्ग खुला ठेवला जातो आणि मोठ्या प्रमाणात दक्षता ठेवली जाते.

इतर मालवाहतूक कार्यान्वयनाचीही  गती कमी होऊ नये यादृष्टीने अशा पद्धतीने सर्वकाही केले जाते.

हे नमूद करायला हवे की, आतापर्यंत सुमारे 160 ऑक्सिजन एक्सप्रेसने आपला प्रवास पूर्ण करत विविध राज्यांना दिलासा दिला आहे.

आतापर्यंत, महाराष्ट्राला 521 मेट्रिक टन, उत्तरप्रदेशला सुमारे 2652 मेट्रिक टन, मध्यप्रदेशला 431 मेट्रिक टन, हरयाणाला 1290 मेट्रिक टन, तेलंगणाला 564 मेट्रिक टन, राजस्थानला 40 मेट्रिक टन, कर्नाटकला 361 मेट्रिक टन , उत्तराखंडला 200 मेट्रिक टन, तामिळनाडूला 231 मेट्रिक टन , पंजाबला 40 मेट्रिक टन, केरळला 118 मेट्रिक टन आणि दिल्लीला सुमारे 3734 मेट्रिक टन ऑक्सिजनचे  वितरण ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे करण्यात आले आहे.

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai    /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719392) Visitor Counter : 142