आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारत सरकारने आतापर्यंत राज्य/केंद्र शासित प्रदेशांना 20 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा मोफत पुरवल्या
राज्ये/केंद्र शासित प्रदेशांकडे अद्याप 2 कोटीपेक्षा जास्त लसींच्या मात्रा उपलब्ध
याव्यतिरिक्त सुमारे 3 लाख लसींच्या मात्रा पुढील 3 दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होणार
Posted On:
17 MAY 2021 12:01PM by PIB Mumbai
देशभरातील व्यापक लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील लसींचे उत्पादन तसेच पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून त्या व्यतिरिक्त कोविड लसींच्या मात्रांचा विनामूल्य पुरवठा करत आहे. या महामारीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन यासाठी चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक याबरोबरच लसीकरण हा या महामारी विरोधातल्या भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा अविभाज्य भाग आहे.
कोविड-19 लसीकरणाच्या व्यापक आणि वेगवान तिसऱ्या टप्याची 1 मे 2021 पासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. या धोरणा अंतर्गत एकूण उत्पादित लसींपैकी केंद्रीय औषध प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या (सीडीएल) लसींच्या मात्रांपैकी 50% मात्रा प्रत्येक महिन्यात सरकारकडून खरेदी केल्या जातील.भारत सरकार पूर्वीप्रमाणे हे डोस पूर्णपणे विनामूल्य राज्य सरकारांना उपलब्ध करुन देत राहील.
भारत सरकारने आतापर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 20 कोटी लसींच्या मात्रा (20,76,10,230) विनामूल्य दिल्या आहेत. आज सकाळी आठ वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून एकूण 18,71,13,705 मात्रा वापरण्यात आल्या.
2 कोटींपेक्षा जास्त कोविड लसींच्या मात्रा (2,04,96,525) अद्याप राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत.
याव्यतिरिक्त, सुमारे 3 लाख (2,94,660) लसींच्या मात्रा वितरीत करण्या़चे कार्य सुरू आहे आणि पुढील 3 दिवसात त्या राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होतील.
***
ST/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1719284)
Visitor Counter : 234
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam