आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातल्या मंत्री गटाची केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली 26 वी बैठक

Posted On: 17 MAY 2021 5:04PM by PIB Mumbai

‘केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली, कोविड-19 संदर्भातल्या उच्च स्तरीय  मंत्री गटाची आज 26 वी बैठक झाली., परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर,  नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप एस. पुरी, बंदरे, नौवहन आणि  जलमार्ग  राज्यमंत्री मनसुख मांडवीय, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, आरोग्य आणि  कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे या डिजिटल बैठकीत सहभागी झाले.

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ विनोद पॉल दूर दृश्य प्रणाली द्वारे या बैठकीला उपस्थित होते.

रेमडेसिवीर,टोसिलीझुमॅब आणि अम्फोटेरीसीन – बी यांची खरेदी आणि वितरण यावर बैठकीत भर देण्यात आला. फेवीपिरावीर या औषधाची कोविड वैद्यकीय मार्गदर्शक सुचनात शिफारस करण्यात आली नसली तरीही या औषधाच्या मागणीत वाढ झाल्याची नोंद यावेळी घेण्यात आली. या औषधांच्या उचित वापरासाठी आयईसीने मोहीम घेण्याची सूचना औषधनिर्मिती सचिव एस अपर्णा यांनी यावेळी केली. सरकारच्या मध्यस्थीनंतर देशात रेमडेसिवीरचे उत्पादन तिप्पटीपेक्षा जास्त होत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. मासिक  सुमारे 39 लाख वायल वरून हे उत्पादन मासिक  118 लाख वायल पर्यंत पोहोचले आहे. म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी उपयोगात येणारे अम्फोटेरीसीन – बीच्या मागणीतही वाढ झाली आहे.  पाच पुरवठादार निश्चित करण्यात आले असून औषधाच्या इष्ट वितरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.1 ते 14 मे 2021 दरम्यान राज्यांना 1 लाख वायल पुरवण्यात आल्या असून  आयातीबाबतचे मार्गही चोखाळण्यात येत आहेत.राज्यांनी सरकारी आणि खाजगी रुग्णालयात न्याय्य वितरण, उपलब्धता, आणि औषध  दुकानाचा  तपशील याबाबत रुग्णालये आणि जनता यांनाही माहिती पुरवावी, अनावश्यक साठा टाळावा आणि उत्पादकांना बिलाचे पैसे वेळेवर चुकते करावे यावर त्यांनी भर दिला.

पुढच्या आठवड्यात  कोविन,  हिंदी आणि 14 प्रादेशिक भाषांत उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती  केंद्रीय आरोग्य सचिव यांनी बैठकीत दिली.  

***

MC/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719460) Visitor Counter : 168