आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड मदतीबाबत अद्ययावत माहिती


कोविड विरोधात लढ्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेली मदत तातडीने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्याचे काम सुरू

11,000 पेक्षा जास्त ऑक्सिजन काँसेन्ट्रॅटर्स, 16,000 हुन अधिक ऑक्सिजन सिलिंडर, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र , 7,000 हुन अधिक व्हेंटिलेटर्स /बाय पॅप, सुमारे 5.5 लाख रेमडेसीविर च्या कुप्या पाठवण्यात आल्या

Posted On: 17 MAY 2021 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 मे 2021

 

कोविड विरोधात सुरु असलेल्या भारत सरकारच्या लढ्यात 27 एप्रिल 2021 पासून विविध देश व संस्थांकडून वैद्यकीय सामुग्री व उपकरणांच्या स्वरूपात मदत मिळत आहे.

'संपुर्ण सरकार' प्रणाली अंतर्गत ही मदत सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोचविण्यासाठी केंद्र्सरकारची  सर्व मंत्रालये व विभाग सहकार्याने व सुरळीतपणे काम करत आहेत.

27 एप्रिल 2021 ते 16 मे 2021पर्यंत 11,321 ऑक्सिजन काँसेन्ट्रॅटर्स 15,801 ऑक्सिजन सिलिंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र, 7,000 हुन अधिक व्हेंटिलेटर्स/बाय पॅप, सुमारे 5.5 लाख रेमडेसीविर च्या कुप्या रस्ते व वायुमार्गाने पाठवण्यात आल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया, रोमानिया, अमेरिका, कझाकस्तान, इंग्लंड, युरोपियन युनियन  (जर्मनी, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया), कतार, कुवेत, ICBF (कतार), ब्रिटिश ऑक्सिजन कंपनी (UK), मेडिकल एड (UK) या देश आणि संस्थांकडून मिळालेल्या मदतीमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे-

Consignments

Quantity

Oxygen Concentrators

263

Ventilators/BiPAP/CPAP

105

Oxygen Cylinder

2,332

Remdesivir

30,753

Casirivimab/Imdevimab

20,000

मिळालेल्या मदतीची  त्वरित विभागणी  आणि संबंधित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडे त्याची पाठवणी नियोजनबद्ध पध्दतीने सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय यावर सतत देखरेख करत आहे. देणग्या, निधी, मदत स्वरूपात परदेशातून आलेल्या सर्व वस्तूंचे समायोजन व पाठवणी साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समायोजन केंद्र उभारले आहे. त्या केंद्राचे काम 26 एप्रिल 2021 पासूनच सुरू झाले आहे. 2 मे 2021 पासून आरोग्य मंत्रालयाने यासाठी एक मार्गदर्शक प्रणाली ठरवून दिली आहे.

ईंचेऑन इथून ऑक्सिजन काँसेन्ट्रॅटेर्स व व्हेंटिलेटर घेऊन आज  सायंकाळी 4: 10 वाजता आलेले हवाईदलाचे AI 1313  विमान 

[DD News Twitter Link: https://twitter.com/DDNewslive/status/1393913009727172610?s=08 ]

* * *

Jaydevi PS/U.Raikar/D.Rane

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai    /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719395) Visitor Counter : 145