विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

पीपीई सूटमध्ये दीर्घकाळ घाम गाळणाऱ्या आरोग्य कर्मचार्‍यांना दिलासा देण्यासाठी डीएसटी समर्थित वेंटिलेशन प्रणाली

Posted On: 17 MAY 2021 5:20PM by PIB Mumbai

आपले कर्तव्य बजावताना दीर्घकाळ पीपीई सूटमध्ये घाम गाळणाऱ्या  आरोग्य कर्मचार्‍यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. पुणे स्थित  स्टार्टअपने  पीपीई किट्ससाठी विकसित केलेल्या एका  सुटसुटीत , किफायतशीर वायुवीजन प्रणालीमुळे अशा किट्स परिधान केल्यावर येणारा अतिरिक्त घाम रोखता येईल.

 

पारंपारिक पीपीई किट्समध्ये एका साध्या बदलासह जोडलेली वायुवीजन प्रणाली शरीराला आराम देते तसेच  बुरशीजन्य आजारांना देखील प्रतिबंध करते.

मुंबईच्या  आदर्श या अभियांत्रिकी शाखेतील निहाल सिंग आदर्शने  त्याच्या वॅट टेकनोव्हेशन्स स्टार्टअपद्वारे सोमैया विद्याविहार विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या  राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या सहाय्याने  (एनएसटीईडीबी) आरआयआयडीएल (रिसर्च इनोव्हेशन इनक्युबेशन डिझाईन लॅबोरेटरी) येथे 'कोव्ह-टेक व्हेंटिलेशन सिस्टम' नावाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

 

के जे सोमैया अभियांत्रिकी महाविद्यालयाचा  विद्यार्थी आणि वॅट टेक्नोव्हिएशनचा संस्थापक निहाल सिंग आदर्शला  एनआयडीएचआयच्या प्रमोटिंग  अँड एक्सेलरेटिंग यंग अँड ऍस्पायरिंग टेक्नॉलॉजी  उद्योजकांना (प्रयास) विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून  प्रोटोटाइप विकास आणि उत्पादनासाठी 10,00,000 रुपये अनुदान मिळाले. आरआयआयडीएल आणि के जे सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या नवीन उद्यम गुंतवणूकीच्या कार्यक्रमातून सहाय्य  म्हणून 5,00,000 रुपये देखील या स्टार्टअपला मिळाले आहेत.

पारंपारिक पीपीई सूटवर कमरेवर साध्या पट्ट्याप्रमाणेच ‘कोव्ह-टेक व्हेंटिलेशन सिस्टम’ घट्ट बांधता येते  आणि कोविड बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी रूग्णालयात कार्यरत डॉक्टर आणि वैद्यकीय चिकित्सकांना यामुळे आराम मिळू शकेल. या वेंटिलेशन प्रणालीची रचना  पीपीई किटमधून  संपूर्ण हवा बंद राहील हे  सुनिश्चित करते. हे केवळ 100 सेकंदांच्या अंतराने  वापरकर्त्याला ताज्या  हवेची झुळूक देते.

 

पुण्यातील दसॉं सिस्टीम्स येथील अत्याधुनिक प्रोटोटाइप सुविधेत विकसित केलेल्या या उत्पादनास वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अंतिम स्वरूप देण्यात आले.

आरआयआयडीएलच्या सल्लागार आणि तज्ज्ञांच्या पथकाने स्टार्टअपला सहाय्य पुरवले असून प्रत्येक टप्प्यावर त्यांना अनुकूल वातावरण  पुरवण्यास  मदत केली, जेणेकरून नवसंशोधकांना सर्वोत्कृष्ट उत्पादन देण्यात मदत होईल, ”असे आरआयआयडीएलचे  गौरांग शेट्टी म्हणाले.

 

पीपीई सूटसाठी वायुवीजन यंत्रणा प्रदान करण्यासाठी सुटसुटीत , पोर्टेबल आणि वापरण्यास सुलभ असे हे  उपकरण आहे. पुण्याच्या  साई स्नेह रुग्णालय, आणि  लोटस मल्टि-स्पेशॅलिटी रुग्णालयात कोवटेक व्हेंटिलेशन प्रणाली  वापरली जात आहे आणि मे / जूनपर्यंत याची व्याप्ती वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

 

अधिक माहितीसाठी, https://www.watttechnovations.com/ (covtech.contact[at]gmail[dot]com, 7774099697) वर संपर्क साधता येईल.

***

MC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719436) Visitor Counter : 234


Read this release in: English , Hindi , Punjabi