संरक्षण मंत्रालय

भारतीय हवाई दलाने रिक्त झालेले क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर्स दुबईला पोहोचवले

Posted On: 17 MAY 2021 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 मे 2021

 

भारतीय वायुसेनेतील अवजड  वाहतूक करणाऱ्या  विमानांचा ताफा   दिनांक 22 एप्रिल 2021 पासून रिक्त झालेले  क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स त्यांच्या भरण्याच्या स्थानकांवर विमानाने  पोचते करत आहेत, जेणेकरून ते भरून घेऊन रस्त्यांद्वारे किंवा रेल्वेने त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवले जातील.आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांबाबतही आता असाच उपक्रम राबविला जात आहे.

  

भारतीय हवाई दलाच्या आयएल-76  या विमानाने जामनगरहून 03  रिकामे क्रायोजेनिक कंटेनर दुबईतील अल मकतूम येथे पोहोचवले आहेत., दुबईत या कंटेनर मध्ये  जलरुप वैद्यकीय प्राणवायु भरून तो जहाजातून  भारतात आणणे  या साठी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड समन्वयक म्हणून काम करत  साधला आहे. रिक्त कंटेनर्सच्या या हवाई वाहतुकीमुळे प्राणवायू आणण्यासाठी लागणाऱ्या वेळेत  बचत होत आहे.

00

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719303) Visitor Counter : 199