आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर्स , ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स आणि 3 लाखांहून अधिक रेमडेसव्हिर इंजेक्शनच्या कुप्या यांचा समावेश असलेले जागतिक मदत साहित्य भारतात दाखल, ही मदत कोविड-19 विरूद्ध लढण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे वेगाने सुपूर्द करण्यात येत आहे
भारतातील एकत्रित लसीकरणाने गाठला 17 कोटी मात्रांचा महत्त्वपूर्ण टप्पा
जागतिक स्तरावर भारत ठरला लसींच्या 17 कोटी मात्रा देणारा सर्वात वेगवान देश
18 ते 44 वयोगटातील 20.31 लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण
गेल्या दहा दिवसांत सरासरी 3.28 लाखांहून अधिक रूग्ण कोविड मुक्त झाल्याची नोंद
Posted On:
10 MAY 2021 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2021
6,738 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, 3,856 ऑक्सिजन सिलिंडर्स, 16 ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स, 4,668 व्हेंटिलेटर / बीआय पीएपी / सी पीएपी आणि 3 लाखांहून अधिक रेमडेस्व्हिर इंजेक्शनच्या कुप्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या आवश्यक पायाभूत सुविधांमधे वाढ करण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी वितरीत केल्या जात आहेत. जलद सीमाशुल्क मंजूरी देत केंद्र सरकार हे सुनिश्चित करीत आहे की, ही जागतिक मदत हवाई आणि रस्तामार्गे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे त्वरित पोहोचली जाईल.
दुसर्या महत्त्वपूर्ण घटनेत, देशभरातील आत्तापर्यंत देण्यात आलेल्या कोविड-19 लसींच्या एकूण मात्रांची संख्या 17 कोटीवर पोहोचली आहे तसेच लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचा वेगही वाढत आहे.
17 कोटी कोविड लसींच्या मात्रा देणारा भारत हा जागतिक स्तरावरील सर्वात वेगवान देश ठरला आहे. चीनला ही महत्वपूर्ण संख्या गाठायला 119 दिवस आणि अमेरिकेला 115 दिवसांचा कालावधी लागला होता.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 17,01,76,603 लसींच्या मात्रा 24,70,799 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यात 95,47,102 पहिली मात्रा, 64,71,385 दुसरी मात्रा तर 1,39,72,612 आघाडीवरील कर्मचारी (1 ली मात्रा), 77,55,283 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा) 18-45 वयोगटातील, 20,31,854 लाभार्थी (पहिली मात्रा) 45 ते 60 वर्षे वयोगटातील 5,51,79,217 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 65,61,851 लाभार्थी (द्वितीय मात्रा) 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 5,36,74,082 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 1,49,83,217 लाभार्थंना द्वितीय मात्रा देण्यात आल्या आहेत.
HCWs
|
1st Dose
|
95,47,102
|
2nd Dose
|
64,71,385
|
FLWs
|
1st Dose
|
1,39,72,612
|
2nd Dose
|
77,55,283
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
20,31,854
|
Age Group 45 to 60 years
|
1st Dose
|
5,51,79,217
|
2nd Dose
|
65,61,851
|
Over 60 years
|
1st Dose
|
5,36,74,082
|
2nd Dose
|
1,49,83,217
|
|
Total
|
17,01,76,603
|
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.79% मात्रा दहा राज्यांतून देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2,46,269 लाभार्थ्यांना कोविड लसीची पहिली मात्रा देण्यात आली असून आज 30 विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकत्रितपणे मिळून 20 ,31,854 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
खालील तक्ता आतापर्यंत 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना मिळालेल्या लसीचा एकत्रित आलेख दर्शवित आहे.
S. No.
|
States
|
Total
|
1
|
A & N Islands
|
904
|
2
|
Andhra Pradesh
|
520
|
3
|
Assam
|
80,796
|
4
|
Bihar
|
88,743
|
5
|
Chandigarh
|
2
|
6
|
Chhattisgarh
|
1,026
|
7
|
Delhi
|
3,02,153
|
8
|
Goa
|
1,126
|
9
|
Gujarat
|
2,94,785
|
10
|
Haryana
|
2,54,811
|
11
|
Himachal Pradesh
|
14
|
12
|
Jammu & Kashmir
|
28,658
|
13
|
Jharkhand
|
82
|
14
|
Karnataka
|
10,782
|
15
|
Kerala
|
209
|
16
|
Ladakh
|
86
|
17
|
Madhya Pradesh
|
29,322
|
18
|
Maharashtra
|
4,36,302
|
19
|
Meghalaya
|
2
|
20
|
Nagaland
|
2
|
21
|
Odisha
|
42,979
|
22
|
Puducherry
|
1
|
23
|
Punjab
|
3,531
|
24
|
Rajasthan
|
3,16,767
|
25
|
Tamil Nadu
|
14,153
|
26
|
Telangana
|
500
|
27
|
Tripura
|
2
|
28
|
Uttar Pradesh
|
1,18,008
|
29
|
Uttarakhand
|
21
|
30
|
West Bengal
|
5,567
|
Total
|
20,31,854
|
गेल्या 24 तासांत 6.8 लाख लाभार्थ्यांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
आज लसीकरणाच्या 114व्या दिवशी (9 मे 2021) 6,89,652 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. एकूण 5,685 सत्रांमध्ये 4,05,325 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 2,84,327 लाभार्थ्यांना त्यांच्या लसीची दुसरी मात्रा मिळाली.
तारीखः 9 मे 2021 (दिवस -114)
HCWs
|
1stDose
|
4,897
|
2ndDose
|
7,192
|
FLWs
|
1stDose
|
26,082
|
2nd Dose
|
21,599
|
18-44 years
|
1st Dose
|
2,46,269
|
45 to 60 years
|
1stDose
|
92,769
|
2nd Dose
|
1,38,198
|
Over 60 years
|
1stDose
|
35,308
|
2nd Dose
|
1,17,338
|
Total Achievement
|
1stDose
|
4,05,325
|
2ndDose
|
2,84,327
|
आज भारतात एकूण 1,86,71,222 रूग्ण कोविडमुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांचा राष्ट्रीय दर 82.39% इतका आहे.
गेल्या 24 तासांत 3,53,818 रूग्ण कोविडमुक्त झाले असल्याची नोंद झाली आहे.
बरे झालेल्या रुग्णांपैकी 74.38% रूग्ण दहा राज्यांतील आहेत.
खालील आलेखात गेल्या दहा दिवसांत दररोज नोंद होत असलेल्या सरासरी 3.28. लाखांहून अधिक रुग्णांची नोंद दर्शविलेली आहे.
गेल्या 24 तासांत 3,66,161 नवीन रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत दहा राज्यांमध्ये 73.91% नवीन रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन 48,401 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये रुग्णांची नोंद झाली 47,930 आहे तर केरळमध्ये 35,801 नवीन रुग्णांची नोंद केली गेली आहे.
भारतातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 37,45,237 वर पोहोचली आहे. हे प्रमाण आता देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 16.53% आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रूग्णसंख्येत 8,589 रुग्णांची भर पडल्याची नोंद झाली आहे.
भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 82.89 %रूग्ण हे 13 राज्यांत एकवटले आहेत.
राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत आहे आणि सध्या तो 1.09% इतका आहे.
गेल्या 24 तासांत 3,754 मृत्यूची नोंद झाली.
दहा राज्यांत नवीन मृत्यूंचे प्रमाण 72.86% इतके आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले (572). त्याखालोखाल कर्नाटकमध्ये दैनंदिन 490 मृत्यू झाले.
गेल्या 24 तासांत तीन राज्ये / केंद्रशासित प्रदेशात कोविड-19 मुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. यात दीव आणि दमण, दादरा आणि नगरहवेली , अरुणाचल प्रदेश आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे.
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717435)
Visitor Counter : 285
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam