PIB Backgrounder
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
04 MAY 2021 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 4 मे 2021



आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
कोविड-19 लसीकरणाचे तिसऱ्या टप्प्यातील व्यापक आणि गतिशील धोरणाची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरु झाली आहे. देशभरात देण्यात आलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या मात्रांची एकूण संख्या 15.89 कोटींच्या पुढे गेली आहे.
12 राज्ये /केंद्रशासित प्रदेशात 18-44 वर्षे वयोगटातील 4,06,339 लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसींची पहिली मात्रा देण्यात आली. छत्तीसगड (1025), दिल्ली (40,028), गुजरात (1,08,191), हरियाणा (55,565), जम्मू-काश्मीर (5,587), कर्नाटक (2,353), महाराष्ट्र (73,714), ओडिशा (6,802), पंजाब (635) , राजस्थान (76,151), तामिळनाडू (2,744) आणि उत्तर प्रदेश (33,544).
आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार एकूण 23,35,822 सत्रांद्वारे 15,89,32,921 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
यामध्ये 94,48,289 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा),62,97,900 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,35,05,877 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 72,66,380 आघाडीवरील कर्मचारी(दुसरी मात्रा), 18-44 वयोगटातील 4,06,339 (पहिली मात्रा ) 45 ते 60 वयोगटातल्या 5,30,50,669 (पहिली मात्रा), आणि 41,42,786 लाभार्थी (दुसरी मात्रा), 60 वर्षावरील 5,28,16,238 लाभार्थी (पहिली मात्रा), 1,19,98,443 (दुसरी मात्रा), यांचा समावेश आहे.
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.94 टक्के मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.
लसीकरण अभियानाच्या 108 व्या दिवशी (3 मे 2021) 17,08,390 लसीकरण मात्रा देण्यात आल्या.
8,38,343 लाभार्थींना 12,739 सत्रात पहिली मात्रा आणि 8,70,047 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,66,13,292 इतकी आहे.
रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 81.91 टक्के आहे.गेल्या 24 तासात 3,20,289 रुग्ण बरे झाले आहेत.
बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 73.14% रुग्ण दहा राज्यांमधील आहेत.
गेल्या 24 तासात 3,57,229 नव्या रुग्णांची नोंद झाली.
नव्या रुग्णांपैकी 71.71% रुग्ण, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू , प . बंगाल, आंध्र प्रदेश,राजस्थान , छत्तीसगड, या दहा राज्यांमध्ये आहेत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 48,621 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्याखालोखाल कर्नाटकात 44,438 तर उत्तर प्रदेशमध्ये 29,052 नव्या रुग्णांची नोंद झाली
भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 34,47,133 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 17 % आहे.
देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 81.41 रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, गुजरात , आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, प. बंगाल, बिहार आणि हरियाणा या बारा राज्यांमध्ये आहेत.
राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.10% टक्के आहे.
गेल्या 24 तासात 3,449 रुग्णांचा मृत्यू झाला
यापैकी 73.15 टक्के मृत्यू दहा राज्यातले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 567 जणांचा मृत्यू झाला, दिल्लीमध्ये 448 आणि उत्तर प्रदेशात 285 जणांचा मृत्यू झाला.
इतर अपडेट्स :
महाराष्ट्र अपडेट्स
बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव येथील नेस्को कोविड केअर सेंटरमध्ये आणखी 1500 खाटा उपलब्ध केल्या आहेत. देशातील पहिल्या ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटरचे उद्घाटन आज मुंबईत झाले. हे केंद्र दादर येथील कोहिनूर स्क्वेअर टॉवरच्या पार्किंग परिसरात उभारण्यात आले आहे. दिव्यांग लोकांना लसीकरण केंद्रात येण्यास अडचण येत असताना अशा प्रकारची ही पहिलीच 'ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर ' सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.





***
MC/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1715981)
आगंतुक पटल : 275