पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

हैदराबादमधील प्राणिसंग्रहालयात सार्स -सीओव्ही 2 ची लागण झालेल्या आशियाई सिंहांच्या प्रकृतीत सुधारणा

नमुन्यांच्या विश्लेषणात चिंताजनक संसर्ग नसल्याचे आढळले

प्राण्यांमधून मानवांमध्ये रोग संक्रमित होऊ शकतो याबाबत कोणताही पुरावा नाही

Posted On: 04 MAY 2021 5:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 मे 2021

24 एप्रिल 2021 रोजी अत्यंत सावधगिरी बाळगत हैदराबाद येथील नेहरू प्राणिसंग्रहालयाने श्वसनाचा त्रास होत असल्याची लक्षणे असलेल्या आठ आशियाई  सिंहांचे सीसीएमबी-लॅकोन्स याना (नाक, घसा आणि श्वसनमार्गातून संकलित) नमुने सामायिक केले. 4 मे 2021 रोजी सीसीएमबी-लॅकोन्स  यांनी सामायिक केलेल्या तपशीलवार निदान चाचण्या आणि अहवालाच्या आधारे, स्पष्ट झाले आहे की नेहरू प्राणिसंग्रहालय  (एनझेडपी), हैदराबाद येथे ठेवलेल्या आठ आशियाई सिंहांना सार्स सीओव्ही 2 विषाणूची लागण झाली आहे.

नमुन्यांचे आणखी विश्लेषण केल्यावर असे आढळून आले आहे की हा संसर्ग चिंताजनक नाही.  आठ सिंहांना अलगीकरणात ठेवले असून योग्य काळजी आणि आवश्यक उपचार केले जात आहेत.  सर्व आठ सिंहांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. ते नेहमीप्रमाणेच वागत असून खाणे व्यवस्थित  आहे. प्राणिसंग्रहालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत  आणि बाह्य संपर्क होऊ नये म्हणून प्राणीसंग्रहालय अभ्यागतांसाठी बंद करण्यात आले आहे.

केंद्रीय  प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सार्स  सीओव्ही -2 च्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर प्राणीसंग्रहालयासाठी सावधगिरीचे दिशानिर्देश आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्याबरोबरच  अनेक पूर्व-उपाययोजना केल्या आहेत.

भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयव्हीआरआय) उत्तर प्रदेश आणि सेल्युलर अणि मोलेक्युलर जीवशास्त्र केंद्र - लुप्त होणार्‍या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी प्रयोगशाळा (सीसीएमबी-लेकोन्स) हैदराबाद यासारख्या वैज्ञानिक संस्था आणि तज्ञांशी  सल्लामसलत केल्यावर  प्रतिबंध, नमुना संकलन, संशयित प्रकरणांचा शोध आणि पशुपालन करणाऱ्यांसाठी  सुरक्षा विषयक नियम यावर देखरेख  आणि मार्गदर्शक सूचना  प्राणीसंग्रहालयांसाठी सुचवण्यात आल्या आहेत . या सूचना   http://cza.nic.in/news/en  वर सहज उपलब्ध आहेत.

पुढील उपाययोजनांचा  एक भाग म्हणून, तज्ञांच्या सल्ल्यानुसार कोविड  खबरदारीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली जात आहेत. अतिरिक्त माहिती लवकरच  दिली जाईल.

जगातील इतर  प्राणीसंग्रहालयांमध्ये जिथे गेल्या वर्षी सार्स -सीओव्ही 2 पॉझिटिव्ह आढळला होता, त्यांच्या अनुभवाच्या आधारे  प्राणी हा रोग मानवांमध्ये  संक्रमित करू शकतो याबद्दल कोणतेही पुरावे नाहीत. म्हणूनच माध्यमांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी याबाबत वृत्तांकन  अत्यंत सावधपणे  आणि जबाबदारीने करावे.

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1715939) Visitor Counter : 135