रसायन आणि खते मंत्रालय

देशातील रेमडेसिविरचे उत्पादन तीनपट झाले- मनसुख मांडवीय


रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या संख्येतही तिप्पट वाढ

Posted On: 04 MAY 2021 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 मे 2021

देशात रेमडेसिविर औषधाचे उत्पादन जलदगतीने वाढविले जात आहे. केवळ काही दिवसांच्या कालावधीत देशाने रेमडेसिविरचे उत्पादन तिप्पट करण्यात यश मिळविले आहे आणि लवकरच या औषधाची वाढती मागणी पूर्ण करण्यात देशाला यश मिळेल अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली इथे दिली.

 

12 एप्रिल2021 रोजी देशात रेमडेसिविरच्या 37 लाख कुप्यांचे  उत्पादन झाले होते त्यात तिप्पट वाढ होऊन आज  4 मे 2021 ला रेमडेसिविरच्या 1 कोटी 5 लाख कुप्या उत्पादित करण्यात आल्या.

रेमडेसिविर औषधाची वाढती मागणी लक्षात घेऊन, या औषधाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. 20 एप्रिल 2021 रोजी देशात रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या 20 कंपन्या कार्यरत होत्या, त्यात वाढ होऊन आज 4 मे 2021 ला एकूण 57 कंपन्या रेमडेसिविरची निर्मिती करीत आहेत.

भारत सरकारने कोरोनाविरुद्धचा आपला लढा  सातत्यपूर्ण प्रयत्नांसह जरी ठेवला आहे.

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1715898) Visitor Counter : 319