आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 16.69 कोटी मात्रा मोफत पुरवल्या
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे लाभार्थीना देण्यासाठी अजूनही 75 लाखाहून अधिक मात्रा उपलब्ध
याव्यतिरिक्त सुमारे 48 लाख मात्रा पुढील 3 दिवसांत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होतील
Posted On:
04 MAY 2021 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2021
केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने कोविड विरूद्ध लढाईचे नेतृत्व करत आहे. केंद्र सरकारच्या महामारी नियंत्रण आणि व्यवस्थापन (चाचणी,शोध,उपचार आणि कोविड सुसंगत वर्तन यांचा समावेश) या पाच सूत्री धोरणाचा लसीकरण हा एक अविभाज्य भाग बनला आहे.
कोविड -19 लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात उदार आणि वेगवान रणनीतीची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरू झाली आहे. नवीन पात्र लोकसंख्या गटांची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे. संभाव्य लाभार्थी थेट कोविन पोर्टलवर (cowin.gov.in) किंवा आरोग्यसेतु ॲपद्वारे नोंदणी करू शकतात.
केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे 16.69 कोटी लसींच्या मात्रा (16,69,97,410) राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवल्या आहेत. यापैकी, वाया गेलेल्या मात्रा धरून एकूण 15,94,75,507 (आज सकाळी 8 वाजता उपलब्ध आकडेवारीनुसार) वापरण्यात आल्या
75 लाखाहून अधिक कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा (75,24,903) अद्याप राज्ये /केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत.
याशिवाय, पुढील 3 दिवसांत 48 लाखाहून अधिक (48,41,670 ) लसीच्या मात्रा राज्ये /केंद्रशासित प्रदेशांना मिळणार आहेत.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1715886)
Visitor Counter : 225