रेल्वे मंत्रालय
दिल्लीला आज आणखी 244 टन ऑक्सिजन मिळणार; या पुरवठ्यासह ऑक्सिजन एक्सप्रेस 24 तासांत एकट्या दिल्लीला सुमारे 450 मे.टन एलएमओ वितरीत करतील
Posted On:
04 MAY 2021 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2021
सर्व अडथळे पार करत आणि नवीन उपाय शोधत भारतीय रेल्वे देशभरातील विविध राज्याना लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) पुरवून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने 103 टँकरमधून देशातील विविध राज्यांमध्ये 1585 एमटी (अंदाजे) एलएमओ वितरित केला आहे. 27 ऑक्सिजन एक्सप्रेसनी आपला प्रवास पूर्ण केला आहे आणि आणखी 6 ऑक्सिजन एक्स्प्रेस 33 टँकर्समधून सुमारे 463 मेट्रिक टन एलएमओ घेऊन धावत आहेत.
रेल्वेकडून आज वितरित करण्यात येत असलेल्या एकूण 382 मेट्रिक टन एलएमओ पैकी जवळपास 244 मेट्रिक टन दिल्लीसाठी आहे, जो आज पुरवण्यात येत असलेल्या एकूण एलएमओच्या सुमारे 64% आहे.
तेलंगणाला देखील आज दुसऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेसने अंगुलहून 60.23 एमटी एलएमओ मिळाले आहे .
आज लखनौला बोकारो येथून ऑक्सिजन एक्सप्रेसमधून 79 टन मिळणार आहे.
आतापर्यंत भारतीय रेल्वेने 1585 मेट्रिक टन पेक्षा अधिक पुरवठा केला असून महाराष्ट्र (174 मेट्रिक टन), उत्तर प्रदेश (492 मेट्रिक टन), मध्य प्रदेश (179 मेट्रिक टन), दिल्ली ( 464 मेट्रिक टन), हरियाणा (150 मेट्रिक टन) आणि तेलंगणा (127 मेट्रिक टन) यांचा त्यात समावेश आहे.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1715948)
Visitor Counter : 316