पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि जंगलातील आगीच्या परिस्थितीचा आढावा घेतला
प्रविष्टि तिथि:
26 APR 2021 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्याशी चर्चा केली आणि राज्याच्या काही भागात जंगलातील आगीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले, “मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्याशी बोललो आणि राज्याच्या काही भागांत जंगलाना लागलेल्या आगीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या संकटावर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्व शक्य त्या सहकार्याचे आश्वासन दिले. आपण सर्वानी मिझोरमच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया.”
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1714144)
आगंतुक पटल : 328
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam