आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 9.43 कोटीपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या, गेल्या 24 तासात दिल्या 36 लाख मात्रा

Posted On: 09 APR 2021 2:50PM by PIB Mumbai

 

देशात कोविड-19  प्रतिबंधक लसीच्या देण्यात आलेल्या एकूण मात्रांनी आज  9.43 कोटीचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 14,28,500 सत्राद्वारे 9,43,34,262 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. लसीकरण अभियानाच्या 83 व्या दिवशी (8 एप्रिल 2021) लसीच्या 36,91,511 मात्रा देण्यात आल्या.. 49,416 सत्राद्वारे 32,85,004 लाभार्थींना पहिली मात्रा  आणि 4,06,507 लाभार्थींना दुसरी मात्रा देण्यात आली.

 

HCWs

FLWs

Age Group 45-60 years

Over 60 years

 

Total

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

89,74,511

54,49,151

98,10,164

45,43,954

2,61,03,814

5,23,268

3,75,68,033

13,61,367

9,43,34,262

जागतिक स्तरावर दैनंदिन मात्रांचे प्रमाण लक्षात घेता भारत दर दिवशी सरासरी 37,94,328 मात्रा देत असून अद्यापही सर्वोच्च स्थानावर आहे. भारतात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ जारी आहे.गेल्या 24 तासात 1,31,968 नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेशदिल्लीकर्नाटककेरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा  राज्यात कोरोना रुग्णांची  दैनंदिन संख्या वाढती असून नव्या रुग्णांपैकी 83.29% रुग्ण या 10 राज्यात आहेत.

 

Date: 8th April,2021

HCWs

FLWs

45 to <60 years

Over 60 years

Total Achievement

1stDose

2ndDose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2ndDose

5,792

28,897

41,462

1,26,651

21,67,078

51,231

10,70,672

1,99,728

32,85,004

4,06,507

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 56,286 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या 9,79,608 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 7.50% आहे.

 

 

 

 

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 73.24% महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक,उत्तर प्रदेश आणि केरळ या पाच राज्यांमध्ये आहेत. देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 53.84%  महाराष्ट्रात  आहेत.

भारतात एकूण 1,19,13,292 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 91.22% आहे.

गेल्या 24 तासात 61,899 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

गेल्या 24 तासात 780  रुग्णांचा मृत्यू झाला.

यापैकी 92.82% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 376 जणांचा मृत्यू झाला.

****

M.Chopade/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1710635) Visitor Counter : 239