आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
गेल्या 24 तासात लसींच्या सुमारे 30 लाख मात्रा देण्यात आल्या, देशात एकूण लसीकरण 9 कोटींच्या वर
जागतिक स्तरावर, दररोज सरासरी 34 लाखांपेक्षा जास्त मात्रा देऊन भारत आघाडीवर आहे
Posted On:
08 APR 2021 11:29AM by PIB Mumbai
जागतिक महामारीविरूद्ध सामूहिक आणि सहकार्यात्मक लढ्यात यावर्षी 16 जानेवारी रोजी सुरू करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमे अंतर्गत भारताने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण लसीकरण मात्रांची संख्या आज 9 कोटींच्या पुढे गेली आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार आतापर्यन्त एकूण 13,77,304 सत्रांद्वारे 9,01,98,673 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत .

जागतिक स्तरावर दररोज दिल्या जाणाऱ्या मात्रांच्या बाबतीत भारत सरासरी 34,30,502 मात्रा देऊन अव्वल स्थानावर आहे.
भारतात दररोज नवीन रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत 1,26,789 नवीन रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, केरळ, पंजाब या दहा राज्यांत कोविड रुग्णांच्या दैनंदिन नवीन संख्येत वाढ दिसून येत आहे. या 10 राज्यांमधील नवीन रुग्णांपैकी 84.21% रुग्ण या 10 राज्यात आहेत.



महाराष्ट्रात सर्वाधिक 59,907 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 10,310 आणि कर्नाटकात 6,976 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
मार्च आणि एप्रिल 2021 च्या पहिल्या सात दिवसात राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या साप्ताहिक सकारात्मकतेच्या दराची तुलना खालील आलेखात दाखवली आहे. याच काळात राष्ट्रीय साप्ताहिक सकारात्मकता दर 6.21% वाढून 2.19% वरून 8.40% वर गेला आहे.

भारताचे एकूण सक्रिय रुग्णसंख्या 9,10,319 वर पोहोचली आहे. ही संख्या देशातील एकूण बाधित रुग्णांच्या 7.04% आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णामधून 66,846 रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 74.13% रुग्ण आहेत. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 55.26% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

भारतात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 1,18,51,393 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 91.67% आहे.
गेल्या 24 तासात 59,258 रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासांत 685 मृत्यूची नोंद झाली.

नवीन मृत्यूंपैकी 87.59% मृत्यू दहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 322 मृत्यू झाले आहेत . पंजाबमध्ये 62 मृत्यू झाले आहेत.
***
MC/SK/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710384)
Read this release in:
Bengali
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam