आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतामध्ये सक्रिय रूग्णसंख्या दीड लाखांपेक्षा कमी

Posted On: 23 FEB 2021 2:38PM by PIB Mumbai

 

देशामध्ये कोरोनाची सक्रिय रूग्णसंख्या दीड लाखांपेक्षा कमी आहे. आज देशात 1,47,306 कोरोनाचे सक्रीय रूग्ण आहेत. एकूण रूग्णसंख्येच्या प्रमाणापैकी सक्रिय रूग्णसंख्येचे प्रमाण 1.34 टक्के आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशात 10,584 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 13,255 रूग्ण या आजारातून बरे झाल्याची नोंद आहे. यामुळे एकूण सक्रिय रूग्णांमध्ये 2,749 प्रकरणांची घट झाली आहे.

भारतामध्ये कोरोना होण्याचा दैनिक दर 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

कोविड-19मुळे होणा-या दैनंदिन मृत्यूदरामध्ये सातत्याने घट नोंदवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 78 जणांचा या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आहे.

दि. 22 फेब्रुवारी, 2021 पर्यंत (लसीकरण मोहिमेच्या 38व्या दिवशी) 2,44,877 सत्रांच्या माध्यमातून 1,17,45,552 जणांना कोविडविरोधी लस देण्यात आली आहे, अशी माहिती आज सकाळी 8.00 वाजता तयार करण्यात आलेल्या हंगामी अहवालामध्ये नोंदविण्यात आली आहे. भारतामध्ये या आजारामधून आत्तापर्यंत 1.07 कोटी (1,07,12,665) रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा आजचा दर 97.22 टक्के आहे. सक्रिय रूग्णसंख्या आणि बरे होणा-या रूग्णांची संख्या यांच्यामध्ये तफावत वाढत असून आज दोन्ही संख्येत 1,05,65,359 इतके अंतर आहे.

 

S.

No.

 

State/UT

Beneficiaries vaccinated

1st Dose

2nd Dose

Total Doses

1

A & N Islands

5,442

1,870

7,312

2

Andhra Pradesh

4,27,444

1,02,376

5,29,820

3

Arunachal Pradesh

21,318

5,332

26,650

4

Assam

1,65,110

13,992

1,79,102

5

Bihar

5,26,159

56,791

5,82,950

6

Chandigarh

14,198

1,089

15,287

7

Chhattisgarh

3,50,716

28,186

3,78,902

8

Dadra & Nagar Haveli

5,019

252

5,271

9

Daman & Diu

1,767

254

2,021

10

Delhi

3,15,841

22,788

3,38,629

11

Goa

15,542

1,269

16,811

12

Gujarat

8,24,119

73,547

8,97,666

13

Haryana

2,13,802

41,811

2,55,613

14

Himachal Pradesh

96,278

12,412

1,08,690

15

Jammu & Kashmir

2,10,544

9,315

2,19,859

16

Jharkhand

2,61,339

13,394

2,74,733

17

Karnataka

5,53,888

1,40,076

6,93,964

18

Kerala

4,05,697

56,232

4,61,929

19

Ladakh

6,610

610

7,220

20

Lakshadweep

2,333

591

2,924

21

Madhya Pradesh

6,43,277

32,124

6,75,401

22

Maharashtra

9,16,977

68,978

9,85,955

23

Manipur

41,799

1,798

43,597

24

Meghalaya

25,998

960

26,958

25

Mizoram

15,749

3,052

18,801

26

Nagaland

23,391

4,418

27,809

27

Odisha

4,43,401

1,22,741

5,66,142

28

Puducherry

9,356

981

10,337

29

Punjab

1,27,528

20,538

1,48,066

30

Rajasthan

7,82,710

62,183

8,44,893

31

Sikkim

13,384

775

14,159

32

Tamil Nadu

3,49,527

36,073

3,85,600

33

Telangana

2,81,365

1,05,936

3,87,301

34

Tripura

84,254

15,066

99,320

35

Uttar Pradesh

11,40,754

86,021

12,26,775

36

Uttarakhand

1,33,636

9,682

1,43,318

37

West Bengal

6,73,939

69,651

7,43,590

38

Miscellaneous

3,57,164

35,013

3,92,177

 

Total

1,04,87,375

 

12,58,177

 

  1,17,45,552

कोरोना आजारातून पूर्ण बरे झालेल्या रूग्णांपैकी 86.56 टक्के रूग्ण सहा राज्यांमधले आहेत.

केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात एका दिवसात 5,035 रूग्ण बरे झाल्याची नोंद आहे. गेल्या 24 तासांमध्ये केरळमधले 5,037 रूग्ण बरे झाले तर तामिळनाडूमधले 461रूग्ण बरे झाले आहेत.

नवीन केरोनाबाधित रूग्णांपैकी 84 टक्के रूग्ण सहा राज्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात सातत्याने नवीन रूग्ण जास्त संख्येने आढळत आहेत. महाराष्ट्रात एका दिवसात 5,210 नवीन रूग्ण आढळले. त्याखालोखाल केरळमध्ये 2,212 रूग्ण सापडले तर तामिळनाडूमध्ये एका दिवसात 449 जणांना कोरोनाची बाधा झाली.

कोरोना या आजारामुळे निधन झालेल्या रूग्णांपैकी 84.62 टक्के रूग्ण सहा राज्यांतले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 18 जणांचे या आजाराने निधन झाले, त्याखालोखाल केरळमधल्या 16 जणांचा मृत्यू झाला आणि पंजाबमधल्या 15 जणांना या आजारामुळे प्राण गमवावे लागले.

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1700173) Visitor Counter : 254