पंतप्रधान कार्यालय
COP26 अध्यक्ष आलोक शर्मा यांची पंतप्रधानांशी चर्चा
प्रविष्टि तिथि:
16 FEB 2021 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2021
26 व्या संयुक्त राष्ट्राच्या पक्षीय हवामानबदल परिषदेचे (COP26) अध्यक्ष खासदार आलोक शर्मा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. COP म्हणजे पक्षीय हवामानबदल परिषद ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या चौकटीमधील हवामानबदल अधिवेशनातील एक शिखर संस्था आहे. या परिषदेच्या 26 व्या सत्राचे आयोजन नोव्हेंबर 2021 ला ग्लासगो येथे करण्यात आले आहे.
COP26 च्या पार्श्वभूमीवर भारत युके मधील सहयोगाबद्दल पंतप्रधान आणि आलोक शर्मा यांच्यामध्ये चर्चा झाली. पंतप्रधानांनी पॅरिस कराराशी भारताची बांधिलकी असल्याचा पुनरुच्चार केला आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी COP26 मध्ये यथायोग्य पावले उचलण्यात येतील असे सांगितले. शर्मा यांनी पंतप्रधानांच्या डिसेंबर 2020 मधील क्लायमेट अम्बिशन समिट मधील भाषणाची आठवण केली.
भारत-युके बंध दृढ करण्यासाठी युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबत काम करण्यासाठीची कटीबद्धताही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1698530)
आगंतुक पटल : 177
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Assamese
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam