पंतप्रधान कार्यालय

पायाभूत सुविधा क्षेत्रात अर्थसंकल्पाच्या प्रभावी उपयोजनाच्या आराखड्यासाठीच्या वेबिनारला 16 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान संबोधित करणार

Posted On: 15 FEB 2021 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22चे पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रभावी उपयोजन या विषयावरील सल्लामसलतीसाठीच्या वेबिनारला पंतप्रधान 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता संबोधित करणार आहेत.

वेबिनारबद्दल

वेबिनारमध्ये 200 पेक्षा जास्त पॅनेलसदस्य सहभागी होतील. त्यामध्ये प्रमुख अर्थसंस्थांचे व फंडांचे प्रतिनिधी, कंत्राटदार, सल्लागार व तज्ञ यांचा समावेश असेल. पायाभूत सुविधांचा दर्जा  व क्षमतावृद्धी, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व या क्षेत्राकडे अधिकाधिक गुंतवणूकीचा ओघ आणणे अश्या अनेक विषयांवर ते चर्चा करतील.

यानंतर दोन मोठी खुली सत्रे होतील. यामध्ये मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व विविध विषय तज्ञ यांच्यामधील चर्चेने अर्थसंकल्पाच्या दृष्टीकोनातून जलद गतीने जारी करता येण्यासारखे प्रकल्पांची यादी केली जाईल व नियोजन आराखडा आखला जाईल. अंतिम धोरण मंजूर करण्याआधी सर्व संबधितांसह सल्लामसलतीचेही नियोजन या दरम्यान आहे.

 

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1698278) Visitor Counter : 123