पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडूच्या विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त ; पीडितांसाठी आर्थिक मदतीची घोषणा
Posted On:
12 FEB 2021 10:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021
तामिळनाडूच्या विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहिनी आणि नुकसानाविषयी पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले असून या दुर्घटनेतील पीडितांसाठी आर्थिक मदत मंजूर केली आहे.
“तामिळनाडूच्या विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना पीडित कुटुंबांसोबत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, हीच प्रार्थना! घटनेतील पीडितांना मदत करण्यासाठी स्थानिक अधिकारी काम करत आहेत.
या दुर्देवी घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मंजूर करण्यात आली आहे.”असे पंतप्रधानांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697599)
अभ्यागत कक्ष : 176
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam