आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर आता जवळपास 97 टक्के झाला असून जागतिक स्तरावरील उच्चांकी दरांपैकी एक आहे


31 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5,000 पेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण

23.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यात आली

Posted On: 28 JAN 2021 12:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021

रुग्ण बरे होण्याच्या एकूण संख्येत सातत्याने वाढ होत असून, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर आता जवळपास 97 टक्के झाला असून  जागतिक स्तरावरील उच्चांकी दरांपैकी हा एक दर आहे. 

1,03,73,606  लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 14,301 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

भारताची एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 1.75 लाख (1,73,740) पेक्षा कमी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आता भारताच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 1.62 टक्के इतके आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये  सतत घसरण होण्याचा राष्ट्रीय कल कायम ठेवत, 31 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्येही सक्रिय रुग्णसंख्या  5,000 पेक्षा कमी नोंदली गेली आहे.

78 टक्के सक्रिय रुग्ण  केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल  या पाच राज्यांमध्ये आहेत

28 जानेवारी2021 रोजी सकाळी साडेसात वाजेपर्यंत 23.5  लाखांहून अधिक (23,55,979) लाभार्थ्यांना देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमे अंतर्गत लस देण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात 6,102 सत्रांमध्ये 3,26,499 लोकांचे  लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 42,674 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

1

A & N Islands

2,385

2

Andhra Pradesh

1,63,727

3

Arunachal Pradesh

7,307

4

Assam

19,945

5

Bihar

89,074

6

Chandigarh

2,355

7

Chhattisgarh

51,647

8

Dadra & Nagar Haveli

345

9

Daman & Diu

320

10

Delhi

39,764

11

Goa

2,311

12

Gujarat

94,524

13

Haryana

1,09,782

14

Himachal Pradesh

14,054

15

Jammu & Kashmir

16,331

16

Jharkhand

24,020

17

Karnataka

2,67,811

18

Kerala

82,970

19

Ladakh

818

20

Lakshadweep

746

21

Madhya Pradesh

1,31,679

22

Maharashtra

1,79,509

23

Manipur

2,855

24

Meghalaya

3,249

25

Mizoram

6,142

26

Nagaland

3,973

27

Odisha

1,78,227

28

Puducherry

1,813

29

Punjab

44,708

30

Rajasthan

2,37,137

31

Sikkim

1,320

32

Tamil Nadu

82,039

33

Telangana

1,30,425

34

Tripura

19,698

35

Uttar Pradesh

1,23,761

36

Uttarakhand

14,690

37

West Bengal

1,58,193

38

Miscellaneous

46,325

Total

23,55,979

काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 77.84% रुग्ण 7 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत

केरळमध्ये काल 5,006 इतक्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात  2,556 रुग्ण बरे झाले आणि त्याखालोखाल  कर्नाटकमध्ये 944 रुग्ण बरे झाले.

गेल्या 24 तासांत 11,666  नवीन रुग्णांची नोंद झाली.

नवीन रुग्णांपैकी 81.96  टक्के रुग्ण  6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

केरळमध्ये  5,659 इतक्या  सर्वाधिक संख्येने नवीन रुग्ण आढळले आहेत.  त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,171 आणि तामिळनाडूमध्ये 512 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत 123 मृत्यूची नोंद झाली.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 75.61 टक्के रुग्ण सात राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.  महाराष्ट्रात सर्वाधिक (32) मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये 20 तर  पंजाबमध्ये 10 जणांचा काल मृत्यू झाला.

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1692882) Visitor Counter : 252