पंतप्रधान कार्यालय

कमला हॅरिस यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 21 JAN 2021 11:52AM by PIB Mumbai

कमला हॅरिस यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  कमला हॅरिस यांचे अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "@VP म्हणून शपथ घेतल्याबद्दल @KamalaHarris यांचे अभिनंदन. ही ऐतिहासिक घटना आहे. भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे.  भारत-अमेरिका भागीदारी आपल्या वसुंधरेसाठी लाभदायक आहे. "

***

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690713) Visitor Counter : 117