PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
20 JAN 2021 7:55PM by PIB Mumbai
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
दिल्ली-मुंबई, 20 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2021 रोजी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रारंभ केला. यावेळी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातली एकूण 3006 केंद्रे दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडण्यात आली होती. संपूर्ण देशभरात राबवली जात असलेली ही मोहीम म्हणजे जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आहे. लस विकसित करण्याच्या कार्यात योगदान देणाऱ्या संशोधकांची प्रशंसा करत पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरवात केली.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भारताची कोविड-19 ची लसीकरण मोहीम अत्यंत महत्वाच्या अशा मानवी मूल्यांवर आधारलेली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ज्यांना लसीची सर्वाधिक गरज आहे, त्यांना ती सर्वप्रथम मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ज्यांना कोविडचे संक्रमण होण्याचा सर्वाधिक धोका आहे, अशा लोकांना आपण आधी संरक्षित करतो आहोत. यात आपले डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील सफाई कामगार आणि निमवैद्यकीय कर्मचारी अशा सर्वांना पहिल्यांदा लस घेण्याचा अधिकार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. हे प्राधान्य सरकारी तसेच खाजगी अशा दोन्ही रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी आहे, असे त्यांनी सांगितले. कोविड-19 लसीकरण मोहिमेचा देशभरात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कोरोनाविरूध्दच्या लढाईदरम्यान देशाने संपूर्णपणे दर्शविलेल्या नि:स्वार्थी भावनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. कोविड -19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करताना मोदी म्हणाले, गेल्या वर्षाने भारतीयांना एक व्यक्ती, एक कुटुंब, एक देश म्हणून खूप काही शिकवले आणि सहन करायला लावले. तेलगु कवी गुराजडा वेंकटा अप्पाराव यांची एक ओळ उधृत करत मोदी म्हणाले आपण सर्वांनी नेहमी इतरांसाठी नि:स्वार्थीपणे कार्य केले पाहिजे, राष्ट्र म्हणजे केवळ माती, पाणी आणि दगड नव्हे तर, राष्ट्र म्हणजे 'आपण सर्वजण' आणि कोरोना विरुद्धचा लढा याच भावनेतून दिला गेला, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रारंभ केला. संपूर्ण देशभरात राबवली जात असलेली ही मोहीम म्हणजे जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार असून जगभरातल्या सुमारे 100 देशांच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे असे सांगून त्यांनी या मोहिमेच्या अभूतपूर्व व्यापकतेची कल्पना दिली. ही संख्या दुसऱ्या टप्यात 30 कोटी पर्यंत न्यायची असून यामध्ये वयस्कर आणि गंभीर बहु व्याधी असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. 30 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारत, अमेरिका आणि चीन हे तीनच देश असल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या व्यापक प्रमाणातली लसीकरण मोहीम इतिहासात अभूतपूर्व असल्याचे सांगून यातून भारताची क्षमता सिद्ध होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भारताने कोविड -19 विरुद्ध लसीकरण मोहिमेला 16 जानेवारी, 2021 रोजी यशस्वी प्रारंभ केल्याबद्दल शेजारी राष्ट्रांच्या नेत्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे अभिनंदन केले आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी व्टिटर या समाज माध्यमाव्दारे म्हटले आहे की, ‘‘कोविड-19 लसीकरण कार्यक्रम सुरू केल्याबद्दल आणि त्यांनी शेजारी मित्रराष्ट्रांविषयी दाखवलेल्या औदार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!''
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भारताने आज महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आज 2 लाखांहून कमी म्हणजे 1,97,201 इतकी झाली आहे. ही संख्या एकूण रुग्णांच्या केवळ 1.86% आहे. 207 दिवसांनंतर हे प्रमाण सर्वात कमी आहे. 27 जून 2020 रोजी एकूण सक्रिय रुग्ण संख्या 1,97,387 होती. गेल्या 24 तासांत 16,988 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे एकूण सक्रिय प्रकरणांत 3327 ची घट झाली आहे. या सक्रिय रुग्णांपैकी 72% हे फक्त 5 राज्यांमधील आहेत. 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 10,000 पेक्षा कमी सक्रिय प्रकरणे आहेत. भारतातील दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये सतत घट होत असल्याने सक्रिय रुग्णसंख्याही कमी होत आहे. जागतिक पातळीवर, गेल्या 7 दिवसांत दर दशलक्ष लोकसंख्येमागे दैनंदिन आढळणाऱ्या नवीन कोविड-19 रुग्णांची सर्वात कमी नोंद असणाऱ्या देशांपैकी भारत एक देश आहे. 20 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 पर्यंत एकूण 6,74,835 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. गेल्या 24 तासांत 3,860 सत्रांमध्ये 2,20,786 लोकांचे लसीकरण करण्यात आले. आत्तापर्यंत 11,720 सत्रे घेण्यात आली आहेत.
एकूण बरे झालेल्यांची संख्या 1.02 कोटी (10,245,741) आहे. काही दिवसांपूर्वी एकूण बरे झालेल्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा एक कोटींनी जास्त होती. ही तफावत आज 10,048,540 वर आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण आज 96.70% पर्यंत सुधारले आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने हा फरक सातत्याने वाढत आहे. नव्याने बरे होणाऱ्यांचे प्रमाण 80.43% असून ते 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आढळले आहेत. नव्याने बरे झालेल्या 4,516 रुग्णांमुळे दैनंदिन बरे होणाऱ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्याखालोखाल केरळमध्ये 4,296 तर कर्नाटकमध्ये 807 रुग्ण बरे झाले आहेत. नवीन प्रकरणांपैकी 79.2% हे सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकवटलेले आहेत. केरळमध्ये दररोजच्या सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद 6,186 झाली आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,294 नवीन प्रकरणे आहेत. दैनंदिन मृत्यूच्या संख्येतही सतत घट होत असून ही संख्या आज 162 आहे. नवीन मृत्यूंमध्ये सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा वाटा 71.6% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक दैनंदिन मृत्यूची (50) नोंद असून त्याखालोखाल केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 26 आणि 11 दैनंदिन मृत्यू होतात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, भू विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवरील वेबिनारला संबोधित केले. वेदांतच्या सहकार्याने स्वराज्य या माध्यम संघटनेने या वेबिनारचे आयोजन केले होते. वेबिनारला संबोधित करताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, "आत्मनिर्भर भारत हा आमच्या सरकारच्या लक्षित क्षेत्रांपैकी एक केंद्रबिंदू बनला आहे ज्याच्या सभोवती सर्व आर्थिक धोरणे आखली जात आहेत. आमचे सरकार श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील दरी दूर करण्यावर आणि सर्व भारतीय नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे जो अंत्योदयाचा खरा अर्थ आहे."
कोविड महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीचा उल्लेख करताना ते म्हणाले, “जैव तंत्रज्ञान विभागाने लस निर्मिती व संबंधित तंत्रज्ञानाच्या प्रगतीला पाठिंबा देण्यात उल्लेखनीय कार्य केले. “मिशन कोविड सुरक्षा - भारतीय कोविड -19 लस विकास मिशन” च्या अंतर्गत आम्ही प्री-क्लिनिकल डेव्हलपमेंट, क्लिनिकल चाचण्या, उत्पादन आणि तैनातीसाठी नियामक सुलभतेच्या आधारे लस विकसित करण्याची गती वाढवली.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कोविड -19 लसीकरणाच्या जगातल्या सर्वात मोठ्या अभियानाची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली त्यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन नवी दिल्लीतल्या एम्स मध्ये डॉक्टर आणि परिचारिका यांच्यासह आघाडीच्या कर्मचाऱ्यांसमवेत उपस्थित होते. कोरोना विरोधातल्या देशाच्या लढ्यात त्यांच्या निः स्वार्थ सेवा आणि कटीबद्धतेची त्यांनी प्रशंसा केली. वर्षापूर्वी सुरु झालेल्या या महामारीच्या अंताचा शेवट सुरु झाला असून या महामारीच्या व्यवस्थापनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरवातीपासूनच सहभागी असून कोविड लसीकरण सुरु करण्यासाठीच्या पाच महिन्याच्या कठोर मेहनतीची ही परिणती असल्याचे डॉ हर्ष वर्धन म्हणाले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भारतातील सार्वजनिक आरोग्याच्या इतिहासात मोठी झेप घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविड-19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. ही जगभरातली आत्तापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे.कोविड -19 लसीकरणाच्या या संपूर्ण देशभरातील भव्य कार्यक्रमाचा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडला. यामध्ये 3,352 सत्रे आयोजित केली होती, त्यामध्ये 1,91,181 लाभार्थींना लस देण्यात आली. लसीकरणाच्या सत्रात 16,755 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
इतर अपडेट्स:
देश आज कोविड-19 विरोधातील जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या ऐतिहासिक प्रारंभाचा साक्षीदार होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटर संदेशांच्या मालिकेत अमित शाह म्हणाले,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनाविरूध्दच्या लढाईतील महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतातील वैज्ञानिकांच्या अलौकिक क्षमतेचे आणि आपल्या बलवान नेतृत्वाचे दर्शन घडवत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
केन्द्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 14 जानेवारी 2021 रोजी एफसीआयच्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त विभागीय कार्यालय, म्हैसुरूच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन केले. महामारी दरम्यान एफसीआयने सुमारे 140 एलएमटी (लाख मेट्रिक टन) धान आणि 390 एलएमटी गहू खरेदी केला तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (पीएमजीकेएआय) 305 एलएमटी अतिरिक्त धान्य मोफत पुरविण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा पीएमजीकेएआयचे थर्ड पार्टीमार्फत लेखापरीक्षण करण्यात आले तेव्हा 94% समाधानकारक अहवाल होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात टाळेबंदी दरम्यान, अन्न आणि सर्व आवश्यक उत्पादने प्रत्येक व्यक्तीस उपलब्ध करुन देण्यात आल्या, हीसुद्धा एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे असे पीयूष गोयल यांनी आपल्या संबोधनात नमूद केले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
खादी उद्योगाला गेल्या वर्षभरात मोठी चालना मिळाली. कोविड-19 मुळे टाळेबंदीचा परिणाम झालेल्या गेल्या वर्षभराच्या कालावधीत भारतीय रेल्वेकडून 48.90 कोटी रुपयांची मोठी खरेदीची ऑर्डर मिळाली. रेल्वेने केवळ डिसेंबर 2020 पर्यंत 8.48 कोटी रुपयांचा माल खरेदी केला. यामुळे रोजगार वाढलाच याशिवाय कसोटीच्या या कोविडकाळात खादी कारागीरांना उत्पन्न मिळाले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
चित्रपट रसिक आणि समीक्षक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट बघत असतात, असा बहुप्रतीक्षित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीचा 16 जानेवारी 2021 रोजी पणजीत शुभारंभ झाला. इफ्फीचे हे 51 वे वर्ष असून, चित्रपटांच्या मनोरंजनाची रेलचेल असलेल्या या महोत्सवाची सुरुवात, चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या उपस्थितीत मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. गोव्यातील पणजी इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयमवर आज जगभरातील चित्रपट कलावंत, निर्माते आणि चोखंदळ रसिकांच्या मांदियाळीत या महोत्सवाचा नाद, पुन्हा एकदा दुमदुमला.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महारष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत तब्बल 14,883 आरोग्य कर्मचार्यांना लसी देण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहिमेदरम्यान कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळले नाहीत, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. शनिवारी राज्यातील 34जिल्ह्यात आणि 27 महानगरपालिकांमध्ये लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. कोविन पोर्टलवर 17,762 लसीकरण करणारे आणि7,85,927 आरोग्य कर्मचारी नोंदणी केली आहे. या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 52.68 टक्के आरोग्य कर्मचार्यांना लसी देण्यात आल्या आहेत. मुंबईत सुमारे 1,597 आरोग्य कर्मचार्यांना काल लसी देण्यात आल्या.
FACT CHECK
* * *
RT/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690540)
Visitor Counter : 312