गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोविड -19 विरुध्दच्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या ऐतिहासिक प्रारंभानिमित्त भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनाविरूध्दच्या लढाईतील महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे
जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतातील वैज्ञानिकांच्या अलौकिक क्षमतेचे आणि आपल्या नेतृत्वाच्या ताकदीचे दर्शन घडवते
मोदीजींच्या नेतृत्वाखालील नवा भारत संकटाचे संधीत आणि आव्हानांचे सफलतेत रूपांतर करत आहे.
मेड इन इंडिया ही लस आत्मनिर्भर भारताच्या दृढनिश्चयाचा पुरावा आहे
मानवतेविरूध्द सर्वात मोठे संकट संपवण्याच्या दिशेने यशस्वी होणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी भारत हा एक देश आहे
प्रत्येक भारतीयाला या अभूतपूर्व यशाचा अभिमान आहे आणि जागतिक पटलावर नवा आत्मनिर्भर भारत उदयाला येत आहे
या ऐतिहासिक दिवशी सर्व कोरोना योध्द्यांप्रति मी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो
Posted On:
16 JAN 2021 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021
देश आज कोविड-19 विरोधातील जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या ऐतिहासिक प्रारंभाचा साक्षीदार होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशांच्या मालिकेत अमित शाह म्हणाले ," पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनाविरूध्दच्या लढाईतील महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतातील वैज्ञानिकांच्या अलौकिक क्षमतेचे आणि आपल्या बलवान नेतृत्वाचे दर्शन घडवत आहे.
अमित शाह म्हणाले ,की मानवतेविरूध्द मोठे संकट संपविण्याच्या दिशेने यशस्वी होणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी भारत हा एक देश आहे. प्रत्येक भारतीयाला या अभूतपूर्व यशाचा अभिमान आहे.
ते पुढे म्हणाले की,जागतिक पटलावर नवा आत्मनिर्भर भारत उदयाला येत आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी नमूद केले ,की मोदींच्या नेतृत्वाखालील नवा भारत हा संकटाचे संधीत आणि आव्हानांचे सफलतेत रूपांतर करत आहे. या ऐतिहासिक दिवशी कोविड योध्द्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अमित शाह म्हणाले, ही 'मेड इन इंडिया ' लस आत्मनिर्भर भारताच्या दृढनिश्चयाचा पुरावा आहे.
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689147)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu