आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 लसीकरणाबद्दल अद्ययावत माहिती


दोन स्वदेशी लसींसह कोविड-19 लसीकरण मोहीमेचा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडला

3,352 सत्रांमधून, 1,91,181 लाभार्थींचे लसीकरण

देशव्यापी लसीकरण कार्यक्रमात 16,755 कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग

लसीकरणश्चात रुग्णालय भरतीच्या एकाही केसची नोंद नाही

Posted On: 16 JAN 2021 11:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

 

भारतातील सार्वजनिक आरोग्याच्या इतिहासात मोठी झेप घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोविड-19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. ही जगभरातली आत्तापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे.

कोविड -19 लसीकरणाच्या या संपूर्ण देशभरातील भव्य कार्यक्रमाचा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडला. यामध्ये 3,352 सत्रे आयोजित केली होती, त्यामध्ये 1,91,181 लाभार्थींना लस देण्यात आली.

लसीकरणाच्या सत्रात 16,755 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

आत्तापर्यंत लसीकरणपश्चात रुग्णालयभरतीची एकाही केसची नोंद नाही.

दोन प्रकारच्या कोविड -19 लसी या लसीकरण मोहिमेदरम्यान वापरण्यात आल्या.

कोविशिल्ड लस (सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत बनवलेली) ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पुरवली गेली.

कोव्हॅक्सिन लस (भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने बनवलेली) ही बारा राज्यांमध्ये पुरवली गेली.

संपूर्ण देशभरात लस व इतर साहित्य यांचे समाधानकारक वितरण केले गेले. काही विभागातील तुरळक ठिकाणी लाभार्थ्यांची यादी अपलोड होण्यासाठी वेळ लागणे यासारखे क्षुल्लक अडचणी आल्या, ज्या यशस्वीपणे पार करता आल्या.

State/UT

Session

Beneficiaries

A & N Islands

2

225

Andhra Pradesh

332

18412

Arunachal Pradesh

9

829

Assam

65

3528

Bihar

301

18169

Chandigarh

4

265

Chhattisgarh

97

5592

Dadra & Nagar Haveli

1

80

Daman & Diu

1

43

Delhi

81

4319

Goa

7

426

Gujarat

161

10787

Haryana

77

5589

Himachal Pradesh

28

1517

Jammu & Kashmir

41

2044

Jharkhand

48

3096

Karnataka

242

13594

Kerala

133

8062

Ladakh

2

79

Lakshadweep

1

21

Madhya Pradesh

150

9219

Maharashtra

285

18328

Manipur

10

585

Meghalaya

10

509

Mizoram

5

314

Nagaland

9

561

Odisha

161

13746

Puducherry

8

274

Punjab

59

1319

Rajasthan

167

9279

Sikkim

2

120

Tamil Nadu

161

2945

Telangana

140

3653

Tripura

18

355

Uttar Pradesh

317

21291

Uttarakhand

34

2276

West Bengal

183

9730

India (Total)

3352

191181

S.Kane/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1689251) Visitor Counter : 268