आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 प्रतिबंधातील मार्गक्रमणात भारताची महत्त्वपूर्ण कामगिरी - 6 महिने आणि 24 दिवसानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांहून कमी
गेल्या 7 दिवसांत दर दशलक्ष लोकसंख्येमागे दैनंदिन आढळणाऱ्या नवीन कोविड-19 रुग्णांची सर्वात कमी नोंद असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश
एकूण 6,74,835 लाभार्थ्यांचे लसीकरण
गेल्या 24 तासात 3,860 सत्रांमध्ये 2,20,786 लोकांचे लसीकरण
Posted On:
20 JAN 2021 2:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2021
भारताने आज महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आज 2 लाखांहून कमी म्हणजे 1,97,201 इतकी झाली आहे. ही संख्या एकूण रुग्णांच्या केवळ 1.86% आहे. 207 दिवसांनंतर हे प्रमाण सर्वात कमी आहे. 27 जून 2020 रोजी एकूण सक्रिय रुग्ण संख्या 1,97,387 होती.
गेल्या 24 तासांत 16,988 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे एकूण सक्रिय प्रकरणांत 3327 ची घट झाली आहे.
या सक्रिय रुग्णांपैकी 72% हे फक्त 5 राज्यांमधील आहेत.
34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 10,000 पेक्षा कमी सक्रिय प्रकरणे आहेत.
भारतातील दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये सतत घट होत असल्याने सक्रिय रुग्णसंख्याही कमी होत आहे.
जागतिक पातळीवर, गेल्या 7 दिवसांत दर दशलक्ष लोकसंख्येमागे दैनंदिन आढळणाऱ्या नवीन कोविड-19 रुग्णांची सर्वात कमी नोंद असणाऱ्या देशांपैकी भारत एक देश आहे.
20 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 पर्यंत एकूण 6,74,835 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. गेल्या 24 तासांत 3,860 सत्रांमध्ये 2,20,786 लोकांचे लसीकरण करण्यात आले. आत्तापर्यंत 11,720 सत्रे घेण्यात आली आहेत.
S. No.
|
State/UT
|
Beneficiaries vaccinated
|
1
|
A & N Islands
|
644
|
2
|
Andhra Pradesh
|
65,597
|
3
|
Arunachal Pradesh
|
2,805
|
4
|
Assam
|
7,585
|
5
|
Bihar
|
47,395
|
6
|
Chandigarh
|
469
|
7
|
Chhattisgarh
|
10,872
|
8
|
Dadra & Nagar Haveli
|
125
|
9
|
Daman & Diu
|
94
|
10
|
Delhi
|
12,902
|
11
|
Goa
|
426
|
12
|
Gujarat
|
21,832
|
13
|
Haryana
|
28,771
|
14
|
Himachal Pradesh
|
5,049
|
15
|
Jammu & Kashmir
|
4,414
|
16
|
Jharkhand
|
8,808
|
17
|
Karnataka
|
82,975
|
18
|
Kerala
|
24,007
|
19
|
Ladakh
|
119
|
20
|
Lakshadweep
|
369
|
21
|
Madhya Pradesh
|
18,174
|
22
|
Maharashtra
|
33,484
|
23
|
Manipur
|
1111
|
24
|
Meghalaya
|
1037
|
25
|
Mizoram
|
1091
|
26
|
Nagaland
|
2,360
|
27
|
Odisha
|
60,797
|
28
|
Puducherry
|
759
|
29
|
Punjab
|
5,567
|
30
|
Rajasthan
|
32,379
|
31
|
Sikkim
|
358
|
32
|
Tamil Nadu
|
25,908
|
33
|
Telangana
|
69,405
|
34
|
Tripura
|
3,734
|
35
|
Uttar Pradesh
|
22,644
|
36
|
Uttarakhand
|
6,119
|
37
|
West Bengal
|
43,559
|
38
|
Miscellaneous
|
21,091
|
|
Total
|
6,74,835
|
एकूण बरे झालेल्यांची संख्या 1.02 कोटी (10,245,741) आहे.
काही दिवसांपूर्वी एकूण बरे झालेल्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा एक कोटींनी जास्त होती. ही तफावत आज 10,048,540 वर आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण आज 96.70% पर्यंत सुधारले आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने हा फरक सातत्याने वाढत आहे.
नव्याने बरे होणाऱ्यांचे प्रमाण 80.43% असून ते 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आढळले आहेत.
नव्याने बरे झालेल्या 4,516 रुग्णांमुळे दैनंदिन बरे होणाऱ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्याखालोखाल केरळमध्ये 4,296 तर कर्नाटकमध्ये 807 रुग्ण बरे झाले आहेत.
नवीन प्रकरणांपैकी 79.2% हे सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकवटलेले आहेत.
केरळमध्ये दररोजच्या सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद 6,186 झाली आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,294 नवीन प्रकरणे आहेत.
दैनंदिन मृत्यूच्या संख्येतही सतत घट होत असून ही संख्या आज 162 आहे.
नवीन मृत्यूंमध्ये सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा वाटा 71.6% आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक दैनंदिन मृत्यूची (50) नोंद असून त्याखालोखाल केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 26 आणि 11 दैनंदिन मृत्यू होतात.
* * *
U.Ujgare/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690346)
Visitor Counter : 273
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam