पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पाचव्या वर्षपूर्तीनिमित्त सर्व संबधितांचे केले अभिनंदन
Posted On:
13 JAN 2021 12:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पाचव्या वर्षपूर्तीनिमित्त सर्व संबधितांचे अभिनंदन केले.
काही ट्विटर संदेशांच्या मालिकेतून पंतप्रधानांनी म्हटले आहे की, “कष्टकरी शेतकरी वर्गाला निसर्गाच्या लहरीपासून संरक्षण देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलल्याला आज पाच वर्षे झाली आहेत. या योजनेमुळे विम्याची व्याप्ती वाढवली गेली, जोखीम कमी झाली आणि त्यामुळे करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळाला. या योजनेच्या सर्व लाभार्थींचे मी अभिनंदन करतो.
पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक लाभाची खात्री कशी मिळाली?
दावे निकाली काढण्यात पारदर्शकता कशी राखण्यात येते?
यासारख्या व इतर पंतप्रधान पीक विमा योजनेशी संलग्न मुद्यांना नमो एपच्या युवर व्हॉईस या नाविन्यपूर्ण विभागातून उत्तरे मिळतील.”
U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688192)
Visitor Counter : 234
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam