आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने अभूतपूर्व शिखर गाठले, कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटीच्या पुढे गेली
बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण उपचाराधीन रुग्णांच्या 44 पट अधिक
एकूण कोविडमुक्त रुग्णांपैकी 51% रुग्ण पाच राज्यांमध्ये आहेत
Posted On:
07 JAN 2021 2:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021
कोविडविरुद्धच्या लढाईत भारताने आज महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.
कोविडमुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येने 1 कोटीचा आकडा (10,016,859) ओलांडला आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
गेल्या 24 तासांत 19,587 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आता वाढून 96.36 % झाला आहे. सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यातील अंतर सतत वाढत आहे (97,88,776)
बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण उपचाराधीन रुग्णांच्या 44 पट आहे.
देशातील एकूण बाधितांची संख्या आज 2,28,083 इतकी असून एकूण बाधित रुग्णांच्या केवळ 2.19 % आहे.
बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी 51% रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ अशा पाच राज्यांत केंद्रित आहेत.
रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 96.36% आहे. त्याचबरोबर सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा रुग्ण बरे होण्याचा दर देखील 90% पेक्षा जास्त आहे.
भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वाधिक आहे. बाधित रुग्णांची अधिक संख्या असलेल्या देशांचा रुग्ण बरे होण्याचा दर भारताच्या तुलनेत कमी आहे.
चाचणी पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे भारताचा सकारात्मकता दरही खाली आला आहे. दैनिक सकारात्मकता दर 3% च्या खाली आहे.
17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा साप्ताहिक सकारात्मकता दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.
काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 79.08 % 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
केरळमध्ये काल एका दिवसात सर्वाधिक 5,110 रुग्ण बरे झाले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 2,570 रुग्ण बरे झाले आहेत.
नवीन बाधित रुग्णांपैकी 83.88% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
केरळमध्ये गेल्या 24 तासांत 6,394 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात 4,382 नवीन रुग्णांची नोंद झाली तर छत्तीसगडमध्ये काल 1,050 नवीन रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासांत 222 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी 67.57% हे सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
महाराष्ट्रात काल एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यूची (66 मृत्यू) नोंद झाली. केरळमध्ये 25 तर पश्चिम बंगालमध्ये 22 नवीन मृत्यूची नोंद झाली.
U.Ujgare/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686755)
Visitor Counter : 223
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam