आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

रुग्ण बरे होण्याच्या दराने 96 टक्क्यांचा (96.04%) टप्पा ओलांडला; जागतिक स्तरावरील सर्वाधिक दरापैकी एक


उपचाराधीन रुग्णसंख्या 2.57 लाखांपर्यंत घटली

रोगमुक्तांची संख्या उपचाराधीन रुग्णसंख्येपेक्षा 96 लाखांहून अधिक

युकेमधील उत्परिवर्तित विषाणूची 25 जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न

Posted On: 31 DEC 2020 1:05PM by PIB Mumbai

 

कोविडविरुद्धच्या लढ्यात भारताने एक मैलाचा दगड पार केला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील रुग्ण बरे होण्याच्या दराने (रिकवरी रेटने) 96 टक्क्यांचा (96.04%)  टप्पा आज ओलांडला. हा जागतिक स्तरावरील  सर्वाधिक रिकवरी रेटपैकी आहे. बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रिकवरी रेट सुधारत आहे.

बरे होणाऱ्यांच्या एकूण संख्येने 98.6 लाखांचा टप्पा (98,60,280) ओलांडला आहे. हा जगातील सर्वाधिक आहे. बाधित होणारे आणि बरे  झालेले या संख्येतील फरक सातत्याने वाढत आहे आणि आता तो 96,02,624 झाला आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या 2.57 लाखापर्यंत खाली घसरली आहे. देशभरातील एकूण उपचाराधीन बाधितांची संख्या 2,57,656 एवढी असून ती एकूण रुग्ण संख्येच्या 2.51 टक्के आहे.

दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्यामुळे मृत्युदरातही सातत्याने घट दिसून येत आहे.

भारतात सातत्याने उपचाराधीन रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे.

गेल्या 24 तासात 21,822  नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली. तर याच कालावधीत 26,139 लोक कोविडमुक्त झाले. यामुळे एकूण बाधित रुग्णसंख्येत एकूण 4,616 नी घट दिसून आली.

नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 77.99%  केसेस 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

कोविडमधून बरे झालेल्यांची नवी संख्या केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे  5,707 आहे, तर

नव्याने बाधित झालेल्यांपैकी 79.87% जण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

दैंनंदिन नवीन रुग्णसंख्या केरळमध्ये सर्वाधिक म्णजे 6,268 व त्या खालोखाल महाराष्ट्रातील नवी रुग्णसंख्या 3,537  होती.

गेल्या 24 तासात 299 जणांचे मृत्यू झाले.

गेल्या 24 तासात नोंदवल्या गेलेल्या कोविडमृत्यूंच्या संख्येपैकी 80.60% दहा राज्ये वा केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 90 मृत्यू  झाले तर केरळ व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 28 मृत्यू झाले.

सरकारी निदानप्रयोगशाळा म्हणजे INSACOG ला जिनोम सिक्वेन्सने आतापर्यंत नवीन उत्परिवर्तित विषाणूंच्या 25 केसेस सापडल्या आहेत. त्यापैकी 4 केसेस पुणे येथील NIV ला तर एक केस दिल्लीच्या IGIBला सापडली. हे सर्व 25 जण विविध आरोग्य केंद्रात विलगीकरणात आहेत.

 

U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685024) Visitor Counter : 179