पंतप्रधान कार्यालय

प्रणाली आणि प्रक्रिया एकीकृत करण्यातून साध्य करण्यात येणारी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पना पंतप्रधानांनी केली विशद


‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झीमम गव्हर्नन्स’ देशव्यापी एकीकृत सेवेतून घेत आहेत आकार

Posted On: 28 DEC 2020 5:06PM by PIB Mumbai

 

चालक विरहीत पहिल्या  मेट्रोचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्डसेवेचा दिल्ली मेट्रोच्या एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईन पर्यंत विस्तारही केला. गेल्या वर्षी अहमदाबाद इथे या कार्डाची  सुरवात करण्यात आली होती.  मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झीमम गव्हर्नन्स, किमान सरकार, कमाल प्रशासन हे सूत्र अवलंबत एक भारत, श्रेष्ठ भारतया संकल्पनेला बळकट करण्यासाठी यंत्रणा आणि प्रणाली एकीकृत करण्यावर त्यांनी भर दिला.

आधुनिकीकरणासाठी समान दर्जा आणि सुविधा पुरवणे महत्वाचे आहे. कॉमन मोबिलिटी कार्ड हे या दिशेने राष्ट्रीय स्तरावरचे  महत्वाचे पाऊल आहे.हे कार्ड  प्रवाशांना कोठेही आणि कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना एकीकृत संधी प्रदान करेल.

कॉमन मोबिलिटी कार्डचे उदाहरण देत, जीवनमान अधिक सुलभ करण्यासाठी  सर्व प्रक्रिया आणि प्रणाली एकीकृत करण्याच्या प्रक्रियेवर भर दिला. याद्वारे देशाची क्षमता अधिक समन्वयाने आणि सुसूत्रपणे गुंफली जात  आहे. एक राष्ट्र, एक मोबिलिटी कार्ड प्रमाणे आपल्या सरकारने मागच्या काही वर्षात देशामधल्या प्रणाली एकीकृत करण्यासाठी अनेक गोष्टी केल्याचे त्यांनी सांगितले.

एक राष्ट्र एक फास्टटैग  मुळे देशातल्या महामार्गावरचा  प्रवास विनाव्यत्यय, सुरळीत  झाला आहे. यामुळे प्रवाशां ना वाहतूक कोंडी आणि विलंब टाळता येत आहे. एक राष्ट्र एक कर प्रणाली म्हणजेच वस्तू आणि सेवा कर यामुळे कर प्रणालीतली गुंतागुंत नष्ट होऊन अप्रत्यक्ष कर प्रणालीत सुसूत्रता आली आहे. एक राष्ट्र एक ग्रीड यामुळे देशाच्या प्रत्येक भागात पुरेसा आणि अखंड वीज पुरवठा सुनिश्चित झाला आहे.

याआधी गॅस आधारित अर्थव्यवस्था आणि जीवन हे स्वप्नवत वाटत होते मात्र एक राष्ट्र  एक गॅस ग्रीडमुळे अखंड गॅस कनेक्टीव्हिटी सुनिश्चित करण्यात येत आहे. एक राष्ट्र एक आरोग्य विमा योजना म्हणजेच आयुष्मान भारत मुळे भारतातले  लाखो लोक देशाच्या कोणत्याही भागातून आरोग्य सुविधेचा लाभ घेत आहेत. एक देश एक रेशन कार्ड मुळे देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात   जाणाऱ्या लोकांची  नव्या ठिकाणी नवे रेशन कार्ड बनवण्याच्या त्रासातून सुटका झाली आहे. त्याचप्रमाणे  नव्या कृषी सुधारणा आणि ई- नाम सारख्या व्यवस्थेमुळे एक राष्ट्र एक कृषी बाजारपेठ याकडे देशाची वाटचाल सुरु असल्याचे  पंतप्रधानांनी सांगितले.

U.Ujgare/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1684128) Visitor Counter : 188