आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड लसीकरणासाठी केंद्र शासनाची तयारी सुरू
देशभरातून 2360 प्रशिक्षण सत्रांतून सात हजार पेक्षा जास्त प्रशिक्षक जिल्हा पातळीवर प्रशिक्षित.
पुढील आठवड्यात चार राज्यांमध्ये लस व्यवस्थापनासाठी सराव
देशभरात covid-19 लसीच्या वितरण यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे
Posted On:
25 DEC 2020 3:46PM by PIB Mumbai
लसीकरणाच्या प्रक्रियेत लस व्यवस्थापनाची महत्वाची भूमिका असल्यामुळे, प्रशिक्षकाना तसेच विविध राज्यात प्लस वितरणाचे व्यवस्थापन करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कोविड लस वितरणासाठी उपलब्ध मनुष्यबळ क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने विविध पातळीवर हाताळणाऱ्यांसाठी सविस्तर प्रशिक्षण सत्रे तयार केलेली आहेत. वैद्यकीय अधिकारी, लस देणारे, लस देणाऱ्यांची पर्यायी फळी, कोल्ड चेन हाताळणी करणारे, सुपरवायझर, डेटा व्यवस्थापक, आशा समन्वयक आणि इतर अशा विविध पातळीवर लसीकरण प्रक्रियेचा भाग असणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची प्रशिक्षण सत्रे आहेत.
या प्रशिक्षणात लसीकरण प्रक्रिया आयोजित करण्या बाबतचे सर्व प्रशिक्षण ,संपूर्ण लसीकरण व्यवस्थापनाच्या दृष्टीने को-विन या आयटी प्लॅटफॉर्मचा वापर, HR कोल्ड चेन तयारीचे उपयोजन, प्रतिकूल परिस्थितीत योग्य व्यवस्थापन, संपर्क आणि आंतर क्षेत्रीय समन्वय, जैव-वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन, संसर्ग रोखण्यासाठी नियमावली या सर्व बाबींचा ह्या प्रशिक्षणात समावेश आहे.
covid-19 प्लस व्यवस्थापनासाठीच्या राष्ट्रीय तज्ञ गटाने केलेल्या शिफारसीनुसार एकूण
लोकसंख्येचे तीन प्राधान्यक्रम गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य सेवा कर्मचारी (साधारणतः एक कोटी) फ्रन्टलाइन वर्कर्स (साधारणपणे 2 कोटी) प्राधान्य वयोगट (साधारणतः 27 कोटी) असे गट प्राधान्याने लसीकरणासाठी केले जातील.
***
G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1683592)
Visitor Counter : 317
Read this release in:
English
,
Urdu
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam